अहमदनगर दि.११ डिसेंबर
केडगाव शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची सात एप्रिल २०१८ रोजी गोळ्या झाडून आणि गुप्तीने गळा चिरुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती . महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या राजकीय वादातून ही हत्या झाली होती. संदीप गुंजाळसह चौघांनी हत्या केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली होती. मात्र मृतांच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासावर आक्षेप घेतल्याने तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता.
या हत्याकांड प्रकरणी शहरातील अनेक मोठ्या राजकारणातील नेत्यांची नावे पुढे आली होती. विशाल कोतकरसह 36 जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्या, हत्येच्या कटासह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी बाबासाहेब केदार याचे नावही समोर आले होते त्याने हत्या करण्यासाठी शस्त्र पुरवल्याचा आरोप केदार याच्यावर होता.मात्र बाबासाहेब केदार यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा कोणताही सबळ पुरावा कोर्टात तपासी अधिकारी सादर करू शकले नाही ही बाब एडवोकेट महेश तवले आणि संजय दुशिंग यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधिश बरालिया यांच्या समोर मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर बाबासाहेब केदार यांचे नाव खटलातून वगळण्याचे आदेश दिले आहेत.
बाबासाहेब केदार यांच्या वतीने खटल्याचे कामकाज एडवोकेट महेश तवले यांनी पाहिले त्यांना एडवोकेट विक्रम शिंदे आणि एडवोकेट संजय वालेकर यांनी सहाय्य केले.