Homeशहरकेडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयामध्ये आ. संग्राम जगताप यांच्या वतीने संगणकाचे...

केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयामध्ये आ. संग्राम जगताप यांच्या वतीने संगणकाचे वितरण संपन्न आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मुलींना बालवायातच संगणकाचे ज्ञान होणे गरजेचे – आ. संग्राम जगताप

advertisement

नगर : काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे विचार असतो, काही लोक नकारात्मक विचारायचे असतात त्यांच्याकडून आपण चांगल्या कामाची अपेक्षा करू शकत नाही, संस्थाचालकांनी मुलींची शाळा काढून त्याला महाराणी ताराबाई कन्या विद्यालय हे नाव दिले असून त्या पाठीमागे मोठा इतिहास आहे आणि या माध्यमातून समाजाला प्रेरणा आणि ऊर्जा देणार आहे, जिल्ह्यामध्ये मुलींची एवढी मोठी शाळा केडगाव उपनगरामध्ये आहे आणि यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुली शिक्षण घेताना दिसत आहे, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलींना बालवायातच संगणकाचे ज्ञान व्हावे यासाठी आम्ही शाळेला अनेक संगणक भेट दिले आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये देखील महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केले आहे, त्यामुळे महिला आता सर्वच क्षेत्रांमध्ये अग्रेसर असून आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले त्यानंतर त्यांनी देखील मुलींची पहिली शाळा काढली, त्यामुळे भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी काम केले आहे त्यांचा आदर्श आजच्या विद्यार्थिनींनी घ्यावा असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने संगणकाचे वितरण संपन्न झाले, यावेळी ज्ञानदेव पांडुळे, संस्थेचे अध्यक्ष रमेश गवळी, सचिव बबनराव कोतकर, उपाध्यक्ष हाजी अहमद शेख, प्राचार्य वासंती धुमाळ, ऋषभ भंडारी आदीसह विद्यार्थी, शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये मुलींची सर्वात मोठी शाळा असून राज्यात गुणवत्तेमध्ये सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे त्यांना संगणकाची अत्यंत गरज होती ही गरज ओळखून आमदार संग्राम जगताप यांनी अनेक संगणक भेट दिले आहे असे ते म्हणाले
कार्यक्रमाचे प्रास्तविक संजय निक्रड तर पाहुण्यांचा परिचय बबन साळवे यांनी केला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती गुंड, जयश्री कोतकर यांनी केले तर आभार प्राचार्य वासंती धुमाळ यांनी मानले.

केडगाव हे शहराचे सर्वात मोठे उपनगर असून या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्य करीत आहे त्यांना विकासाच्या सुविधा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, यात केडगाव लिंक रोड हा महत्त्वाचा रस्ता याचबरोबर अर्चना हॉटेल ते नेप्ती उपबाजार समिती या रस्त्याचे काँक्रिटीकरण काम देखील प्रगतीपथावर आहे त्याचबरोबर अमरधाम रस्ता त्यावरील पूल, सोनेवाडी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण आदींसह विविध भागांमध्ये अंतर्गत कामासाठी मोठा निधी दिला असल्यामुळे केडगावच्या विकासाला गती मिळाली असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular