Homeक्राईमदोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी सोशल मिडियावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या...

दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी सोशल मिडियावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या इसमांवर तोफखाना पोलीस स्टेशन कडून गुन्हे दाखल

advertisement

अहिल्यानगर
थोडक्यात हकीकत अशी की, दि.१२/०८/२०२६ रोजी इंन्स्टाग्राम या सोशल मिडिया अप्लिकेशनवर अहिल्यानगर येथील मुकुंदनगर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने टाकण्यात आलेल्या पोस्टवर समाजातील अपप्रवृत्तीच्या इसमांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल याची जाणीव असताना देखील आक्षेपार्ह कमेंट केल्याने त्याची तात्काळ दखल घेवून पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या सुचनेप्रमाणे पो.हे.कॉ १००७ बाळासाहेब सिताराम खामकर व पो.हे.कॉ ३२० तनवीर सलीम शेख यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. ६९१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९२, ३५३(२) प्रमाणे व ६९२/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९२, ३५३(२) प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

तसेच यापुढेही सोशल मिडियावर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा कोणत्याही धर्माच्या जातीच्या वर्गाच्या भावना दुखावल्या जातील अशी कोणीही पोस्ट किंवा कमेंट करु नये, अन्यथा अशा इसमांवर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी कळविले आहे

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. मुम्माका सुदर्शन सो, मा.अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री.वैभव कलुबर्मे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, नगर शहर विभाग, अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री.बालाजी वैद्य व तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular