HomeUncategorizedअखेर खर्डा गाव ग्रुप ग्रामपंचायत मधून वेगळा करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर ....शिवपट्टन...

अखेर खर्डा गाव ग्रुप ग्रामपंचायत मधून वेगळा करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर ….शिवपट्टन विकास युवा मंचच्या पाठपुरव्याला यश

advertisement

खर्डा दि.२३ जुलै

खर्डा येथे आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच संजीवनी वैजनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
यावेळी झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थ आक्रमक झाले होते.रविवारी खर्डा गाव ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने बंद ठेवले होते.त्यानंतर आज विशेष ग्रामसभेत युवक आक्रमक झाले विविध विषयावर चर्चा करताना ग्रामस्थ आणि सरपंच यांच्या मध्ये चांगलीच खडाजंगी झाली मात्र गावच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे सरपंच संजीवनी वैजनाथ पाटील यांनी सांगितले तसेच या सभेत ग्रुप गाव पंचायती मधून वगळण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.शिवपट्टन विकास युवा मंचच्या माध्यमातून खर्डा गावातील सर्व युवक आणि ग्रामस्थ एकत्र आले होते त्या माध्यमातून हा लढा उभारण्यात आला होता.

राजकीय दृष्ट्या संवेदनशील व जामखेड तालुक्यात सर्वात मोठी असलेले ग्रुप ग्रामपंचायत असून खर्डा शहरासह दरडवाडी, पांढरेवाडी, गीतेवाडी, गवळवाडी, नागोबाचीवाडी, मुंगेवाडी यासह वाड्या वस्त्या त्यांचा समावेश असणारी या मोठ्या ग्रामपंचायतचे विभाजन होऊन लोकसंख्या व मतदारांच्या निकषावर खर्डा शहरात स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याच्या मागणीला ग्रामसभेमध्ये उपस्थित सतरा ग्रामपंचायत सदस्य पैकी १३ ग्रामपंचायत उपस्थित सदस्यांनी पाठिंबा दिला तर भाजपचे चार जण अनुपस्थित होते.

यावेळी उपसरपंच शितल भोसले, माजी उपसरपंच रंजना लोखंडे,ग्रामपंचायत सदस्या दैवशाला काळे, पूनम खटावकर, सदस्य महालिंग कोरे, वैभव जमकाळे, मदन पाटील , डॉ.सोपान गोपाळघरे, महेश दिंडोरे, राजू मोरे ,प्रकाश गोलेकर, गणेश शिंदे यांच्यासह गणेश ढगे, ओंकार इंगळे, रावसाहेब सुरवसे, बबलू गोलेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, जामखेड मार्केट कमिटीचे संचालक वैजनाथ पाटील, आरपीआय तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, वडार समाज संघटनेचे अध्यक्ष बबलू सुरवसे, शरद येवले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनी व्यक्त केले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular