अहमदनगर दि.२२जुलै
पुणे नांदेड एक्सप्रेस या रेल्वेमध्ये रेल्वे तिकीट निरीक्षक धर्मवीर कुमार सुबुकलाल हे तिकीट तपासणी करत असताना बोगी क्रमांक एक मध्ये सीटवर झोपलेल्या एका अज्ञात इसमास त्यांनी तिकिटाची मागणी केली. त्यावर त्याने रेल्वे कर्मचारी आहे असे सांगितले तेंव्हा तिकीट निरीक्षकांनी त्याला पास, आई -डी मागीतले असता त्या अज्ञात इसमाने तिकीट तपासणी अधिकाऱ्याबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली . आणि दौंड कॉर्ड लाइन आल्यावर तो खाली उतरला आणि दगड़ घेऊन येऊन तिकीट निरीक्षाकाच्या डोक्यात मारून पसार झाला.
त्या इसमाची अजून ओळख पटली नसून
हा प्रकार घडत असतानाच त्या ठिकाणी दुसरे तिकीट निरीक्षक अंजुम सय्यद यांना ही घटना कळताच त्यांनी धर्मवीर यांना प्रथमोपचार करून नगर मधील रेल्वे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल. दगड मारल्याने धर्मवीर यांच्या डोक्याला आठ टाके पडले आहेत. धर्मवीर यांच्या तक्रारीवरून त्या फुकट्या अज्ञात प्रवाशा विरोधात कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.