अहिल्यानगर दिनांक 18 जुलै
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगर शहर अध्यक्ष किरण काळे यांनी सध्या शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत रान पेटवले आहे.थेट खा. संजय राऊत यांनी या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
किरण काळे यांनी आरोप केलेला भ्रष्टाचार हा भाजपा आणि तत्कालीन शिवसेनेचा महापौर असताना आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमहापौर स्थयी समिती सभापती असणाऱ्या काळात झाला आहे.मात्र
भ्रष्टाचाराची राळ उठवून सुधा या बाबत कोणीच काही प्रतिक्रिया देताना दिसत नाही अपवाद शिवसेना शिंदे गटाचे संभाजी कदम वगळता.
तर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर खा.संजय राऊत आणि किरण काळे यांनी आरोप केले होते त्यावर आमदार संग्राम जगताप यांनी खासदार संजय राऊत यांना मुंबईत असताना उत्तर दिले मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्याचे पदाधिकारी आणि तत्कालीन नगरसेवक,स्थायी समिती सभापती यांनी पद उपभोगलेले असताना.मात्र पक्षावर आणि आमदारांवर आरोप होत असताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सन्नाटा पसरलेला आहे.तर भाजपमध्ये शिंदे गट शिवसेनेत काही वेगळे काही आहे असे काहीच नाही त्यांच्या गोटातही शांतता आहे. आमदारांन वर आरोप होत असताना त्यांना मुंबईतून प्रतिक्रिया द्यावी लागते मात्र शहरातील पक्षाचे पदाधिकारी काहीच प्रतिक्रिया देत नाही हे विशेष. मध्यंतरी आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतली त्यावेळी राज्यभरातून त्यांच्याविरोधात आंदोलने झाली त्यावेळी सुधा कोणत्याच पदाधिकाऱ्याने आपली भूमिका मांडली नाही अपवाद सुरेश बनसोडे वगळता कोणीही हिंदुत्वावर उघड भूमिका घेतली नाही.जेव्हा आपल्या नेत्यावर राजकीय टीका टिपण्णी होतात तेव्हा पदाधिकाऱ्यांची फौज पुढच्या टीकाकारावर तुटून पडणे अपेक्षित असताना फौज गप्प बसलेली दिसतेय.
किरण काळे यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर कोणीच राजकीय पदाधिकारी काही प्रतिक्रिया देत नसताना महापालिका आयुक्तांना प्रतिक्रिया द्यावी लागते ही सुधा विचार करण्यासारखी बाब आहे.
किरण काळे यांनी तत्कालीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक शिंदे गटात गेले यावर बोलताना “ते” नगरसेवक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दारात जाऊन रडले असे आरोप केला.
आरोप झालेल्या काळात शिवसेना, भाजपचाच महापौर होता शिवसेनेने जो भ्रष्टाचार उघड केला आहे त्या काळामध्ये भाजप व मिन्धे गटाचे आत्ताचे पदाधिकारी सत्तेच्या खुर्चीवर होते. वास्तविक पाहता त्यांना येथील जनतेने निवडून दिले ते शिवसेनाप्रमुख व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, हिंदू धर्मरक्षक स्व. अनिलभैया राठोड यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे त्यांना निवडून दिले व ते नगरसेवक झाले हे ते विसरले. यांच्याकडे कोणता विश्वास आहे ? यांची प्रवृत्ती विटा, वाळू, गोळा करायची आहे. रस्त्यासाठी हे लागत असते तस डांबर ही लागत असत. पण यांनी डांबर सुद्धा खाल्ल आणि आता तेच डांबर तोंडालाही फासल आहे, असा आरोप काळे यांनी केला आहे.
2016 ते 2020 पर्यंतच्या काळात शिवसेनेच्या सुरेखा कदम, भाजपचे बाबासाहेब वाकळे आणि शेवटी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे असे महापौर होते.तर राष्ट्रवादी काँग्रेस सुधा त्यावेळी त्यांच्या सोबत होती त्यामुळे भ्रष्टाचारचा आरोप तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांवर होत असताना कोणीच काही बोलत नाही हे विशेष.
त्यामुळे सध्या तरी शहरात राजकीय जुगलबंदीत किरण काळे हे एकट्या वाघा प्रमाणे डरकाळी फोडत असताना त्यांना घाबरून बाकी इतर पक्षाचे पदाधिकारी मात्र चिडीचूप आहेत.तर राष्ट्रवादी भाजपच्या पदाधिकारी फक्त नावाला पद उपभोगत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय.