Home शहर गोरगरिबांच्या ताटातील अन्न कोण हिसकावतेय.. रेशनच्या काळ्या बाजारातील भीषण सत्य…

गोरगरिबांच्या ताटातील अन्न कोण हिसकावतेय.. रेशनच्या काळ्या बाजारातील भीषण सत्य…

अहिल्यानगर दिनांक २१ जुलै

गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकार दरमहिन्याला रेशन दुकानाच्या मध्यातून धान्य पुरवठा करते मात्र हे धान्य गोरगरिबांच्या ताटातून काढून बाजारात विक्री करण्याचा काळाबाजार सध्या तेजीत आहे.

रेशन मालाचा काळाबाजार होतो याची अनेक उदाहरणे अनेक वेळा समोर आली आहेत. पोलिसांनी आणि पुरवठा विभागाने अनेक वेळा रेशनचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी जाताना पकडलेला आहे. त्यामुळे यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने विविध उपाय योजले आहेत. या मध्ये रेशन दुकानातून धान्य घेण्यासाठी ग्राहकांचे थंबनेल घेतले जाते. हे आधार कार्डशी जोडलेले असते आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण (biometric authentication) यासाठी वापरले जाते. ज्यामुळे रेशन दुकानांचा काळाबाजार रोखण्यासाठी मदत होईल असे सरकारला वाटत असले तरी यामधूनही काही चलाख लोकांनी मार्ग शोधून काढला आहे. आणि त्याद्वारे गरिबांच्या घशातला घास हा काळा बाजारात अद्यापही विकला जातो आहे.

नगर शहरातील रेशनचा माल अजूनही काळा बाजारात विकला जात असून यामधून काही ठारिक लोक महिन्याला कोटी रुपयांची माया कमावत आहेत. यामध्ये नगर शहरातील शुभम आणि गोडाऊन वर आपल्याला गुणे यांची महत्त्वाची भूमिका असून रेशन धारकाच्या नावाने माल उचलून तो संबंधित रेशन दुकानार न देता खुल्या बाजारात विक्री केला जातो .यासाठी शुभम यांने “कर” च्या माध्यमातून आपली मोठी साखळी शहरात उभी केली असून त्याद्वारे गरिबांच्या ताटातील धान्य खुल्या बाजारात विकले जाते.

आता विशेष म्हणजे सरकारने रेशनचा मालकाला बाजारात जाऊ नये म्हणून बायोमेट्रिक सुविधा केली असली तरी यावरही या धान्य तस्करांनी उपाय काढला असून ऑटोमॅटिक बायोमेट्रिक मशीन दोन जणांनी शहरात आणली असल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे. या मशीन द्वारे जे ग्राहक कधीच रेशन दुकानात येत नाही त्यांचे बायोमेट्रिक करून त्यांच्या नावावरचे धान्य वितरित केले असल्याचं दाखवले जाते. भिंगार मधील “रबा”आणि नगर शहरातील “कर” या दोघांकडे हे मशीन असून दर महिन्याला हा कार्यक्रम राबवला जातो अशी माहिती समोर आली आहे.

“कर”नामक व्यापारी हा संपूर्ण शहरातील माल उचलून तो खुल्या बाजारात विक्री करण्यात पटाईत असून गेल्या दोन महिन्यापासून दुकानदारांच्या उचललेल्या मालाचे पैसे दिले नसल्यामुळे सध्या काळा बाजारात धान्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू आहे.शहरी भागातील तांदूळ 19 रुपये किलोने घेतला जातो तर ग्रामीण भागातून आलेला तांदूळ हा 23 रुपये किलोने येतो व 26 रुपये किलोंनी खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांना विकला जातो. यामध्ये माल पोहोच करण्याची जबाबदारी ही विकणाऱ्यावर असते. (क्रमशः)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version