Home शहर पर्यावरणाला हानीकारक असलेल्या व अनेकांच्या बळी घेणाऱ्या चायना तसेच नायलॉन मांजावर राज्यात...

पर्यावरणाला हानीकारक असलेल्या व अनेकांच्या बळी घेणाऱ्या चायना तसेच नायलॉन मांजावर राज्यात गुटखाबंदी प्रमाणे बंदी घालण्या यावी अशी मागणी एम आय एमची मागणी

अहमदनगर द.६ जानेवारी

मकर संक्रातीला मोठ्या प्रमाणात युवक पतंग उडवितात. पतंगबाजीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जीवघेण्या चायना (नायलॉन) मांजाच्या वापर सर्रास होत आहे.चायना तसेच नायलॉन मांजाची शहरात सर्रास विक्री होत असताना देखील डोळे झाक केली जात आहे. चायना मांजा लवकर तुटत नसल्याने, काही वर्षापासून अनेक नागरिकांचे गळे व हात कापले गेले आहेत. आत्ता ५ दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या एका अधिकारीला चायना (नायलॉन) मांजामुळे गंभीर दुखापत झाली आणि या मांजामुळे पशु,पक्ष्यांचे देखील मोठ्या प्रमाणात बळी जाऊन त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
या जीवघेण्या चायना व नायलॉन मांजावर राज्यात सुरू असलेल्या गुटखाबंदीप्रमाणे बंदी घालण्याची गरज आहे. केंद्र सरकार मेक इन इंडिया चा नारा देत असताना या चायना मांजाची एवढे मोठ्या प्रमाणात विक्री कशाप्रकारे होत आहे. प्रशासनाच्या वतीने फक्त दिखाव्या साठी चायना मांज्यावर कारवाई करण्यात येते, मात्र त्यावर पुर्णत बंदी आणण्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

मनुष्य सह पशु, पक्ष्यांचे जीव घेणाऱ्या चायना मांजावर सक्तीने बंदी घालुन, विक्री करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करावी, तसेच याला कायमचा प्रतिबंध करण्यासाठी गुटखा बंदी प्रमाणे चायना तसेच नायलॉन मांजावर बंदी आणण्याची मागणी एम आय एम चे शहराध्यक्ष सरफराज जागीरदार, कार्याध्यक्ष मतीन शेख व विद्यार्थी शहराध्यक्ष सनाउल्लाह खान यांच्या नेतृत्वाखाली एम आय एम पक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version