अहमदनगर दि.१२ जुलै
राज्य सरकारच्या अधिस्वीकृती समितीवर अहमदनगर शहरातील लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके आणि महाराष्ट्र टाइम्स नगर जिल्ह्याचे संपादक विजयसिंह होलम यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ही निवड जाहीर केली.
सुधीर लंके यांनी लोकमत पेपरच्या माध्यमातून वेळोवेळी विविध विषयांना हातळून ते विषय मार्गी लावण्याचा मोठं काम केलं आहे. अनेक वर्षापासून लोकमत पेपरच्या अहमदनगर जिल्ह्याची धुरा ते सांभाळत असून अभ्यासू आणि पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे संपादक म्हणून त्यांची ओळख आहे.
तर विजयसिंह होलम यांनी महाराष्ट्रातील विविध मोठ्या पेपर समूहाच्या माध्यमातून आपल्या कामाचा आणि पत्रकारितेचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र टाइम्स आणि होलम असं एक समीकरण अहमदनगर मध्ये तयार झाले असून विश्वासनीय बातमीदारी आणि बातमीचा शेवटपर्यंत पिच्छा पुरवणे तसेच पत्रकारांवर होणारे अन्याय विरुद्ध आवाज उठवून आणि पत्रकारांसाठी काहीतरी वेगळे करण्याची धडपड यातून ते नेहमीच पत्रकारांच्या संबंधित कामांसाठी कार्यरतअसतात.
सुधीर लंके आणि विजयसिंह होलम यांच्या निवडीचे अहमदनगर शहरासह जिल्ह्यातून विविध मान्यवरांनी स्वागत केले असून अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती नियम २००७ नुसार राज्य आणि विभागीय समित्या स्थापन केल्या जातात. त्यांची मुदत तीन वर्षांची असते. प्रसार माध्यमांशी संबंधित पात्र व्यक्तींची निवड करून राज्य सरकारचे अधिस्वीकृत पत्र देण्यासाठी शिफारस करण्याचे काम समितीकडून केले जाते.