अहमदनगर दि.११ जुलै
सुरभि हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रसिद्ध पोटविकार व लिव्हर तज्ञ डॉ. वैभव चंद्रकांत अजमेरे यांची चेअरमनपदी एकमताने निवड झाली. आज मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी अस्थिरोग तज्ञ डॉ. विलास व्यवहारे, डॉ. नितीन फंड, डॉ. मंदार शेवगावकर, डॉ. अमित पवळे, डॉ. अमितकुमार पवार, डॉ. गणेश जंगले, डॉ. प्रितेशकुमार कटारिया, डॉ. सुनील आवारे, डॉ. विनायक शिंदे, डॉ. आशिष भंडारी, ॲड. गणेश शेंडगे हे संचालक उपस्थित होते. अजमेरे यांच्या नावाची सूचना डॉ. व्यवहारे यांनी मांडली, त्याला डॉ. शेवगावकर यांनी सर्व संचालकांच्यावतीने अनुमोदन दिले.
डॉ. अजमेरे यांनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, हैदराबाद येथून पोटविकार व लिव्हर तज्ञ म्हणून उच्च शिक्षण घेतले आहे. वैद्यकीय शिक्षणाची पदवी (एमबीबीएस) त्यांनी कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट, एमडी मेडिसिन पदव्युत्तर पदवी घाटी, औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयातून प्राप्त केली आहे. डॉ. वैभव अजमेरे हे कोपरगाव शहरातील मूळ रहिवासी आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते वैद्यकीय व्यवसायात आहेत. नगर शहरात ते गेल्या पाच वर्षापासून, तर तीन वर्षापासून पूर्णवेळ सुरभि हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. नगरसह बीड, औरंगाबाद, पुणे आदी परिसरातील जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी त्यांच्याकडे येतात.
सुरभि हॉस्पिटल गेल्या पाच वर्षांपासून नगरकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. हृदय रोग तज्ञ डॉ. अमित भराडिया, प्लास्टिक व पुनर्रचनात्मक सर्जन डॉ. रोहित फुलवर, कॅन्सरतज्ञ डॉ. तुषार मुळे, हृदयशल्य चिकित्सक डॉ. इब्राहिम पटेल, युरोसर्जन डॉ. अमित देशपांडे, फिजिशियन व अतिदक्षता तज्ञ डॉ. प्रियन जुनागडे, लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. श्रीतेज जेजुरकर, भूलतज्ञ डॉ. भूषण लोहकरे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुलभा पवार, रेडिओलॉजिस्ट डॉ. रिचा पितळे आदी पूर्णवेळ तज्ञ डॉक्टर आहेत. सुमारे अडीचशे बेड उपलब्ध असलेल्या या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत, माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना आदी शासकीय योजनांसह सर्व खाजगी कंपन्यांचे कॅशलेस उपलब्ध आहे. एमआरआय, सिटीस्कॅनसह सर्व प्रकारचे रेडिओलॉजी विभागाच्या सुविधा आहेत. सर्व प्रकारच्या गंभीर शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. सुसज्ज असे डायलेसिस युनिट आहे. सलग दोन वर्ष स्वच्छतेचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार व एनएबीएच मानांकन रुग्णालयास मिळालेले आहे.