HomeUncategorizedलोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण उतरणार ? शंकरराव गडाख,प्रतापराव ढाकणे यांच्या नावाची...

लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण उतरणार ? शंकरराव गडाख,प्रतापराव ढाकणे यांच्या नावाची चर्चा…

advertisement

अहमदनगर दि.३० ऑगस्ट
राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडल्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत संभ्रम अवस्थेत आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या जे चित्र कधी पाहायला मिळेल असे स्वप्नातही मतदारांना वाटले नव्हते ते चित्र मतदारांनी 2019 पासून ते 2023 पर्यंत पाहिले आहे. 2019 ला महाविकास आघाडी स्थापन होऊन राज्यामध्ये कधी नव्हे ते शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महा विकास आघाडी स्थापन होऊन त्यांनी सत्ता खेचून आणली हा धक्का कुठेतरी पचवत असताना अचानकपणे महाविकास आघाडी मधून फुटून शिवसेनेचा एक गट भाजपला जाऊन मिळाला आणि पुन्हा शिवसेनेच्या एका गटाची आणि भाजपची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली. हा धक्का पचवला जात नाही तोच पुन्हा शिवसेना भाजप आणि त्यांच्या साथीला राष्ट्रवादीचा एक गट येऊन मिळाला आणि पुन्हा तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. विशेष म्हणजे मतदारांनी नाकारलेल्या आणि मतदारांनी कौल दिलेल्या सर्वच पक्षांचे सरकार 2019 पासून महाराष्ट्रात राज्य करून गेलं.

आता सध्या राज्यात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत असल्यामुळे राज्याची सत्तेचे समीकरणे बदलली आहेत. काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत उमेदवार कोण असतील आणि काय रणनीती असेल याबाबत सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना संभ्रम आहे. मागील तीन महिन्यांपूर्वी लोकसभेसाठी एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्याच्या तयारीत असलेले उमेदवार आता एका महायुती मध्ये आल्यामुळे काही ठिकाणच्या लोकसभेच्या उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र आता या लोकसभेत कशाप्रकारे निवडणुकीची लढत होईल हे सांगणे मात्र कठीणच आहे.

अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार झाला असून अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे खासदारकीला आमदार निलेश लंके यांचे नाव घेतले जात होते. त्या प्रकारे आमदार निलेश लंके यांनी तयारी केली होती आमदार लंके यांच्या तयारीमुळे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहील अशी अपेक्षा नगर दक्षिण मधील मतदारांना होत असतानाच राज्यातील राजकीय घडामोडी नंतर आमदार निलेश लंके यांनी अजित पवार गटाची साथ दिल्यामुळे निलेश लंके यांचे नाव आता खासदारकीच्या रेस मधून मागे पडल्यासारखे झाले आहे त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या वतीने कोण उमेदवार असेल याची चर्चा सध्या सुरू असून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे बैठक घेऊन अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात महाविकास आघाडीचा उमेदवार देण्याबाबत चाचणी केली आहे. अशी खात्रीशीर माहिती समजतेय.सध्या नेवासा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार माजी मंत्री शंकर गडाख यांचे नाव खासदारकीच्या रेसमध्ये आले असताना सोशल मीडियावर काही दिवसांपासून संघर्ष नेते आणि पाथर्डी मतदारसंघातून आमदारकीची तयारी करणारे प्रताप काका ढाकणे यांच्या नावाची ही चर्चाl सुरू आहे. कारण सोशल मीडियावर सध्या “नगर दक्षिणचे भावी खासदार प्रताप काका ढाकणे सहेब” या नावाचे अकाउंट तयार झाले असून प्रताप काका यांचे समर्थक याबाबत चर्चा करत आहेत. कारण राष्ट्रवादी फुटल्यानंतर प्रताप काका ढाकणे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या नावाला हिरवा कंदील मिळू शकतो. तसे असले तरी प्रताप काका ढाकणे गेल्या काही महिन्यांपासून शेवगाव पाथर्डी मतदारसंघ पिंजून काढला असून प्रत्येक गावात वाडीवस्तीवर जाऊन त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे तसेच कांदा प्रश्न असेल महागाई बेरोजगारी यावरही त्यांनी वेळोवेळी आंदोलन केल्यामुळे सध्या तरी प्रताप काका ढाकणे यांचे पाथर्डी शेवगाव मतदार संघात पारडे जड असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये सध्यातरी अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात अजित पवार गट हा तगडा वाटत असून शरद पवार गटाबरोबर काही जुने आणि निवडक कार्यकर्ते असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत काय चित्र राहणार यावर प्रश्नचिन्ह आहे. तर अजित पवार गट शिवसेना-,भाजपा बरोबर गेल्यामुळे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा मार्ग तरी सध्या सुखकर असून विकास कामांच्या जोरावर आणि भाजप राष्ट्रवादी शिवसेना यांच्या एकत्रित ताकदीवर ते निवडणुकीला उतरल्यानंतर त्यांना फारशी अडचण येईल असे वाटत नाही. मात्र जर महागाई बेरोजगारी आणि राज्यात सुरू असलेल्या धार्मिक तेढ याचाही या निवडणुकीत परिणाम होऊ शकतो मतदारांची नाराजी गुप्तपणे मतदान यंत्रातून प्रकट झाली तर याचा फटका ही भाजपला बसू शकतो. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या वतीने कोणता उमेदवार लोकसभेसाठी निवडला जातो यावर लोकसभेचे चित्र आणि संघर्ष अवलंबून आहे.

आमदार शंकरराव गडाख आणि प्रताप काका ढाकणे हे दोन्हीही नेते अहमदनगर दक्षिण जिल्ह्याला नवीन नाहीत त्यामुळे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना तगडी फाईट देण्यासाठी हे दोन उमेदवार सध्या तरी चर्चेत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular