Home जिल्हा निवडणूकी नंतर बरोबर ४५ दिवसांनी खासदार नीलेश लंकेंच्या निवडीला सुजय विखेंकडून हायकोर्टात...

निवडणूकी नंतर बरोबर ४५ दिवसांनी खासदार नीलेश लंकेंच्या निवडीला सुजय विखेंकडून हायकोर्टात आव्हान…. 1991 ची पुनरुक्ती होणार का ?

छत्रपती संभाजीनगर दि.२० जुलै
By आवाज महाराष्ट्राचा
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका महायुतीचे पराभूत उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. नीलेश लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

माजी खासदार डॉ .सुजय विखे यांनी ॲड. आश्विन होन यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेतून काही मतदान केंद्रांवरील मोजणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. संबंधित ४० ते ४५ केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नाही. त्याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रीतसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी केलेली आहे. याशिवाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नीलेश लंके व त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत. तसेच नीलेश लंकेंनी दाखविलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्ष खर्च यांचा ताळमेळ दिसून येत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखविलेला नाही.
परिणामी, लंके यांनी दाखविलेल्या निवडणुकीतील खर्चातील मर्यादेचे उल्लंघन आदी मुद्यांवर सुजय विखे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे मॅक पोल साठी 40 लाख रुपये शुल्क भरून 40 मतदान केंद्रावर मॅक पोल करण्याची मागणी केली होती. तर बरोबर निवडणुकीनंतर ४५ दिवसांनी आता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यामुळे निश्चित काहीतरी मोठे घडण्याची शक्यता असून यामुळे पुन्हा एकदा 1991 सालची पुनरावृत्ती होते का काय अशी चर्चा सुरू झाली आहे. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि यशवंतराव गडाख यांच्या निवडणुकीची पुनरावृत्ती 2024 मध्ये होणार का याकडे आता सर्वांची लक्ष आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version