अहमदनगर दिनांक 5 जून
अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आणि त्यानंतर आता या पराभवाची कारणे हळूहळू समोर येऊ लागली आहेत. सुरुवातीलाच डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तिकीट मिळणार नाही यासाठी पक्षातीलच काही लोक पैजा लावत होते त्यानंतर तिकीट भेटले आणि रुसवाफुगविचे खेळ सुरू झाले. हे खेळ संपल्यानंतर कार्यकर्ते आणि नेते यांचा समन्वय राहिला नाही जरी नेते यांचा रुसवा निघाला असला तरी कार्यकर्त्यांचा रुसवा शेवटपर्यंत राहिला. अहमदनगर जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेगट शिवसेना, मनसे कुठेच एकत्रितपणे काम करताना दिसला नाही. आगामी विधानसभा गणित लक्षात घेऊन जो तो आपापल्या पद्धतीने प्रचारामध्ये सहभागी होत होता. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बरोबर असल्यामुळे महायुतीतील काही घटक पक्ष नाराज झाले होते ते कुठेच सक्रिय प्रचारात दिसले नाही फक्त मोठ्या नेत्यांच्या सभेमध्ये मागच्या खुर्चीवर त्यांचे दर्शन झाले तेवढेच काय ते प्रचारात दिसले महायुतीतील शिवसेना शिंदे गट मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि भाजपा हे फक्त मोठ्या नेत्यांच्या सभेमध्येच एकत्र आल्याचे चित्र होते मात्र स्थानिक पातळीवर कोणीच एकामेकांसोबत काम करण्यास तयार नसल्यामुळे प्रत्येक जण एकला चलो ची भूमिका घेऊन काम करत होत. याचाच मोठा फटका या निवडणुकीत महायुतीला बसला असून अहमदनगर शहरात आमदार संग्राम जगताप यांची यंत्रणा काम करताना दिसत होती मात्र भाजप मधील काही जण आणि इतर मित्र पक्ष विरोधी पक्षाचा चोरी छुपे निवडणुकीचा प्रचार करताना दिसून येत होती मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचाही फटका या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना बसला आहे.
ज्याप्रमाणे कांदा दूध आणि श्रीगोंदा भागात सकळाई योजना निवडणुकीत घातक ठरली त्याचप्रमाणे सुरुवातीला जे आरोप झाले ते म्हणजे खासदार फोन उचलत नाही त्यानंतर येणारी यंत्रणा आणि स्वीय सहायक यावर विरोधी पक्षांनी चांगलाच जोर दिला या गोष्टी विरोधी पक्षाच्या प्रत्येक भाषणांमध्ये येत असल्यामुळे याचा मोठा परिणाम या निवडणुकीत जाणवला.
महायुतीतील घटक पक्षांमधील समन्वय नसल्याने आणि अहमदनगर शहरात महायुतीतील सर्वच घटक पक्ष हे स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात लढत असल्यामुळे अहमदनगर शहरात कुठेच महायुती एकत्र असल्याचं दिसून आले नाही. त्याचाही फटका नगर शहराच्या मताधिक्यावर झाला आहे.जर महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी एकत्र काम केले असते तर अहमदनगर शहरात मागील वेळी पेक्षा जास्त मताधिक्य महायुतीला मिळू शकले असते मात्र अहमदनगर शहरातील स्थानिक राजकारणही या पराभवला कारणीभूत आहे.
अहमदनगर शहरातील स्थानिक राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे यांनी एकत्रितपणे काम केल्यापासून अनेक भाजप नेते कार्यकर्ते नाराज होते त्याचप्रमाणे घटक पक्षातील नेते आणि कार्यकर्तेही या कारणामुळे दूर गेले आणि त्यांनी थेट विरोधी पक्षाचे काम केले.
त्याचप्रमाणे भाजपने मुस्लिम समाजाबाबत घेतलेली भूमिका आणि अहमदनगर शहरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणांमध्ये मुस्लिम समाजबाबत केलेले विधान यामुळे संपूर्ण मुस्लिम समाज महायुतीच्या विरोधात होता तसेच मुस्लिम समाजाला महायुतीने गृहीतच न धरल्यासारखे त्यांच्याकडे मते मागण्यासाठी गेले नसल्यामुळे मुस्लिम समाजाने एक शिक्का महाविकास आघाडी चालवली ही सर्वात मोठी गोष्ट या निवडणुकीत झाली असून त्याप्रमाणे मराठा आंदोलना चा फटकाही या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना बसला आहे.manoj जरांगे पाटील यांच्या उपोषण बाबत महसूल मंत्री यांनी केलेली काही विधाने आणि त्यानंतर आलेली लोकसभा यामुळे तोही फटका या निवडणुकीत चांगलाच बसला आहे.
लोकसभेच्या आडून अनेक नेते आपल्या विधानसभेचा प्रचार करताना दिसून आले काल आलेल्या मतांच्या आकड्यांवरून आता अनेक नेत्यांना विधानसभेची स्वप्न पडू लागली आहेत आणि मताधिक्य आपल्यामुळेच कसे मिळाले याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. लोकसभेची निवडणूक झाल्यामुळे आणि मताधिक्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक जण आमदारकीचे बाशिंग बांधून तयार असून काही दिवसातच आता त्याची सुरुवात होणार आहे मात्र सध्याच्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक धक्कादायक गोष्टी घडल्या असून या राजकारणामुळे आगामी विधानसभेत चांगलीच रंगत येणार आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या नाट्यानंतर विधानसभेचे नाट्य लवकरच सुरू होऊन पुन्हा एकदा मतदारांना नवीन शो पाहायला मिळणार आहे.