Home राज्य मेगा पोलीस भरती, 14 हजार 956 जागांच्या पोलीस भरतीची निघाली जाहिरात

मेगा पोलीस भरती, 14 हजार 956 जागांच्या पोलीस भरतीची निघाली जाहिरात

मुंबई दि.२८ ऑक्टोबर

राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्याबाबत गृहखात्याने अध्यादेश काढला आहे गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरती होणार म्हणून चर्चा सुरू असताना आता प्रत्यक्षात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे यात संपूर्ण राज्यात 14 हजार 956 पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. एक नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. एक नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तशा सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. 3 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत भरतीसाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. यासाठी policerecruitment2022.mahait.org आणि WWW.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर पोलीस भरतीसाठीची माहिती मिळणार आहे. दरम्यान अर्जदार एकाच विभागात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

कुठे किती जागा आहेत?
मुंबई – 6740
अहमदनगर – 129
धुळे – 42
कोल्हापूर – 24
पुणे ग्रामीण – 579
सातारा – 145
सोलापूर ग्रामीण  – 26
औरंगाबाद ग्रामीण- 39
नांदेड – 155
परभणी – 75
हिंगोली – 21
नागपूर ग्रामीण – 132
भंडारा – 61
चंद्रपूर – 194
वर्धा – 90
गडचिरोली – 348
गोंदिया – 172
अमरावती ग्रामीण -156
ठाणे शहर – 521
पुणे शहर – 720
पिंपरी चिंचवड – 216
मिरा भाईंदर – 986
नागपूर शहर – 308
नवी मुंबई – 204
अमरावती शहर – 20
सोलापूर शहर- 98
लोहमार्ग मुंबई – 620
ठाणे ग्रामीण – 68
रायगड -272
पालघर – 211
सिंधूदुर्ग – 99
रत्नागिरी – 131
नाशिक ग्रामीण – 454
अकोला – 327
बुलढाणा – 51
यवतमाळ – 244
लोहमार्ग पुणे – 124
लोहमार्ग औरंगाबाद -154
एकूण – 14956

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version