Home शहर स्व. महेंद्र कुलकर्णी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी नगरमध्ये शोकसभेचे आयोजन

स्व. महेंद्र कुलकर्णी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी नगरमध्ये शोकसभेचे आयोजन

अहमदनगर दि.१६ डिसेंबर

नगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक समाचार चे संपादक मालक महेंद्र कुलकर्णी यांचे 9 डिसेंबर रोजी हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले त्यांच्या या अचानक जाण्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून लोकसत्ता पासून सुरुवात करून दैनिक समाचार चे मालक होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि संघर्षमय होता. पत्रकारितेच्या सर्वच क्षेत्रात त्यांचा गाढा अभ्यास होता त्यांच्या या जाण्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

ज्येष्ठ पत्रकार स्व. महेंद्र कुलकर्णी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शनिवार दि. 17 डिसेंबर रोजी 4 वाजता पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोक सभेस सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अहमदनगर प्रेस क्लब व प्रिंट/इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version