अहमदनगर दि.१६ डिसेंबर
अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनच्या बाहेर गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास युवा मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बंटी डापसे,बजरंग दलाचे शहराध्यक्ष कुणाल भंडारी यांनी एम आय एमचे शहराध्यक्ष सय्यद मोहममद सर्फराज यांच्या मध्ये वाद झाला असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सर्फराज सय्यद यांच्या तक्रारीवरून बंटी डापसे आणि कुणाल भंडारी यांच्यासह अन्य दोन जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सय्यद यांना सुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन धक्का बुक्की केल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात कुणाल भंडारी आणि बंटी डापसे यांच्या विराधात भादवी कलम 323,506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणाचा तपास पोसई समाधान सोळंके हे करत आहेत