अहमदनगर दि.२ ऑक्टोबर
महारष्ट्र सरकारचं शिष्ठमंडळानं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवुन सविस्तर चर्चा केली यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी २ महिण्यांचा कालावधी दिलाय आणि यानंतर त्यांनी उपोषण सोडलं, मनोज जरांगेंना यांना पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर मध्ये सुद्धा आमरण उपोषण सुरु होतं हे उपोषण सुद्धा प्रशासनाच्या विनंती नंतर सोडण्यात आलं पोलिस अधिक्षक राकेश ओला प्रांत अधिकारी सुधीर पाटील आणि तहसीलदार शिंदे आमदार संग्राम जगताप मदन आढाव यांच्या हस्ते नराळपाणी घेवुन गोरख दळवी,संतोष आजबे, अमोल हुंबे, यांनी उपोषण सोडले तर यातील नवनाथ काळे यांची तब्येत गंभीर झाली असल्यामुळे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नगर शहरातील चितळे रोड आणि गुलमोहर रोड या ठिकाणी बसलेल्या उपोषणकर्त्यांनीही आज उपोषण सोडले आहे
आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषण करताना आज उपोषण सोडले असले तरी उद्यापासून पुन्हा साखळी उपोषण २ जानेवारी पर्यन्त सुरुच राहणार असुन जर दोन जानेवारीला आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर मात्र सरकारला मराठ्यांचा उद्रेक पाहायला मिळेल असा इशारा सुद्धा मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी दिलाय.
तर अहमदनगर शहरातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर साखळी पद्धतीने उपोषण सुरूच राहणार आहे. यासाठी सर्व समाज बांधवांनी एक दिवस तरी तहसील कार्यालयासमोरील उपोषण स्थळी भेट द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.