अहमदनगर दि .१ नोहेंबेर – मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या) भिंगार शहर महिला अध्यक्षा सौ. कांता बोठे हे १३ वर्षांपासून पक्षात एकनिष्ठ कार्यरत होत्या त्यांनी पक्षाचा पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांच्याकडे राजीनामापत्र दिला यावेळी बोठे यांचे समर्थक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुण मुले आत्महत्या करत आहे. सर्व राजकीय पुढार्यांनी आजपर्यंत मराठा समाजाला वेड्यात काढले आहे. यापुढे आता फक्त मराठा समाजाला आरक्षण एवढेच धैर्य आहे असे बोठे यांनी राजीनामापत्र देताना सांगितले