HomeUncategorizedमराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे मागणी करता नगर मध्ये मराठा बांधवांचा...

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे मागणी करता नगर मध्ये मराठा बांधवांचा मशाल मोर्चा..

advertisement

अहमदनगर दि.३१ऑक्टोबर

अहमदनगर शहरात मंगळवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मशाल मोर्चा काढण्यात आला होता या मशाल मोर्चाला मराठा समाजातील महिला आणि पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. नुकत्याच आपला पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देणारे मदन आढाव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून या मशाल मोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा माळीवाडा, अशा टॉकीज चौक ,कापड बाजार दिल्ली गेट मार्गे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळापाशी येऊन विसर्जित करण्यात आला.

ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी नगर शहर दुमदुमून गेले होते विशेष म्हणजे या मशाल मोर्चामध्ये मराठा बांधवांसह अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिल बोरुडे आणि शिवसेनेचे युवा नेते संदीप दातरंगे यांची विशेष उपस्थित होती एक मराठा लाख मराठा ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणा देत या मोर्चात दोघेही सामील झाले होते. अनेक ओबीसी बांधवांनी आता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणी करता पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये संदीप दातरंगे ,संजय झिंजे, धनंजय जाधव ,अनिल बोरुडे भगवान फुलसौंदर आणि ज्ञानेश्वर काळे यांचा प्रामुख्याने समावेश आहे तर अनेक ओबीसी समाज बांधव या मागणीला पाठिंबा देत आहेत.

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून देऊ नये या मागणी करता मागील एक महिन्यापूर्वी नगर शहरातील ओबीसी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालया जाऊन निवेदन दिले होते त्या मध्ये भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर, भाजप नेते बाळासाहेब भुजबळ, राष्ट्रवादी नेते अंबादास गारुडकर, शिवसेनेचे माजी नगरसेवकव दत्ता जाधव, शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सुभाष लोंढे, भाजपाचे बाबासाहेब सानप, नितीन भुतारे, परेश लोखंडे, संजय सागांवकर, राजेंद्र
पडोळे, हाजी शौकत तांबोळी, शांताराम राऊत, विकास मदने, साहेबराव विधाते, संजय लोंढे,
निलेश चिपाडे, मच्छिंद्र गुलदगड, प्रशांत शिंदे, खलिल शेख,, अमित खामकर, सचिन गुलदगड,आदिंसह विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular