अहमदनगर दि.१ नोव्हेंबर
अहमदनगर शहरामध्ये महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले आहे. महावितरणच्या वतीने जे लाईट बिल ग्राहकांना दिले जाते ते वेळेवर न देता अनियमितपणे कधीही ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाते तसेच दर महिन्याला मीटरचे रीडिंग घेऊन न जाता अचानकपणे लाईट बिल आल्यानंतर ते लाईट बिल हजारो रुपया पर्यंत ग्राहकाच्या हातात ठेवले जाते. लाईट बिलची रीडिंग आणि ग्राहकाला आलेले लाईट बिल यामध्ये मोठी तफावत आढळून येत असून या सर्व भोंगळ कारभाराला महावितरण विभागाचे नेमून दिलेले ठेकेदार जबाबदार असून या ठेकेदारांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांचा ठेका रद्द करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गिरीष भाऊ जाधव युवासेना जिल्हाप्रमुख पप्पू भाले युवासेना विभागप्रमुख महेश शेळके कामगार सेना शहरप्रमुख गौरव ढोणे, भगवान कोकणे ,प्रतिक बोडखे, सुनिल भोसले, सलिम शेख,सोनु शेख, राजु पळसकर, साजिद शेख, बाग रतनडॉ. श्रीकांत चेमटे,महेंद्र तिवारी आदींनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता निवेदन देऊन मागणी केली आहे तसेच येणारा काळ दिवाळी सनवाराचा असून या काळात कोणत्याही वीजवितरणने ग्राहकाचे वीज तोडू नये. नियमित बिलापेक्षा १० ते २० पट मीटर रीडिंग वाढून आले, त्यासंदर्भातही आपण योग्य ती काळजी घेऊन ग्राहकांना योग्य ते बील द्यावे. सदरील कामाचे ठेकेदार वेळेवर रिडींग घेत नाही, वेळेवर बील देत नसून, त्यांच्या महावितरण कंपनीने कारवाई करून त्यांचा ठेका रद्द करावा, वीजवितरण कंपनीने योग्य तो निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांची अडचण लक्षात घेऊन कार्यवाही करावी अन्यथा महावितरण विरोधात आंदोलनाचा पावित्रा घेऊन वीजवितरण कार्यालयास शिवेसनेतर्फे टाळे ठोकण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.