अहमदनगर दि.१५ सप्टेंबर
अहमदनगर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या (Maratha community ) वतीने १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकारी यांना भेटून वादग्रस्त विधान करणाऱ्या पोलीस निरीक्षक बकाले (Police Inspector Kiran Kumar Bakale)याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्याला बडतर्फ करावे तसेच पुढील काळात कोणत्याही समाजाविषयी बोलू नये यासाठी शासकीय स्तरावर सरकारने आदेश काढावे अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन करण्यात येणार आहे.
जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याने मराठा समाजाबद्दल अतिशय घाणेरडे,अश्लील वक्तव्य केले आहे. त्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आधी त्याची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली होती मात्र परिस्थितीचे गांभीर्य पाहून नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी बकालेच्या निलंबनाचे आदेश काढले होते मात्र आता याप्रकरणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बकाले याची पोलिस खात्यातून हकलपट्टी करावी अशी मागणी केली आहे त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेतो हे पाहणे उचित ठरणार आहे.
बकालेच्या निषेधार्थ दि.16 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता नगर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अहमदनगर यांची भेट घेऊन लिखित स्वरूपात निषेध नोंदविण्यात येणार आहे.मराठा समाज व या घटनेचा निषेध करु इच्छिणारे सर्व बांधवांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन मराठा क्रांती मोर्चा- (Maratha Kranti Morcha ) सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.