मुंबई दि.२४ जानेवारी
मराठा आरक्षणाबाबत आता सरकारने मोठी भूमिका घेतली असून मराठा आरक्षणाबाबत फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवण्याची सरकारने तयारी केली असून मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर आरक्षणाचा कायदा पूर्ण करण्याची तयारी सरकारने केली असल्याची खात्रीलायक माहिती असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणाही केली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मराठा समाजाला मिळू शकतो.
मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळावे या मागणी करता मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना होत आहेत. अंतरवाली सराटी पासून पुण्यापर्यंत लाखो मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे स्वागत केले आहे . यात्रा जशी जशी पुढे जात आहे तसा तसा हा प्रतिसाद वाढत असून त्यामुळे आता सरकारी पातळीवर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.
मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन आरक्षणाबाबत कायदा केला जाऊ शकतो यावर आता तीव्र हालचाली वरिष्ठ पातळ सुरू आहेत.