HomeUncategorizedशहरात आयपील,बिंगो,मावा,गुटका, सर्वच जोमात प्रशासन कोमात शाळा,कॉलेज,पोलीस ठाण्याजवळ विक्री केंद्रे

शहरात आयपील,बिंगो,मावा,गुटका, सर्वच जोमात प्रशासन कोमात शाळा,कॉलेज,पोलीस ठाण्याजवळ विक्री केंद्रे

advertisement

अहमदनगर दि.१८ एप्रिल
सरकारने गुटखा बंदीचा निर्णय घेतला खरा मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही होत नसल्याचे समोर येत आहे. सुगंधी सुपारी आणि बंदी घातलेला गुटखा आजही सर्रास पान टपऱ्यावर डबल भावात मिळत आहे. ज्याप्रमाणे बिंगो आणि आयपीएल सारखे व्यसन तरुणांना लागले आहे. त्याचप्रमाणे गुटका ,मावा तरुणांचं आयुष्य उध्वस्त करत आहेत. मावा आणि गुटखा खाऊन तरुण कॅन्सर कडे वाटचाल करत असताना सरकारी प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष करतानाचा चित्र दिसून येत आहे.

आयपील सट्टा धंद्याबरोबरच मावा ,गुटखा विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. शाळेजवळ पोलीस स्टेशनच्या बाहेर या टपऱ्या सर्रासपणे पाहायला मिळतात 24 तास म्हटलं तरी या टपऱ्या सुरू असतात कधीमधी पोलीस अथवा अन्न औषध प्रशासन काही ठिकाणी छापे टाकतात मात्र छापा टाकल्यानंतर काही तासातच या मावा बनवणाऱ्या आणि गुटखा विकणाऱ्या टपऱ्या पुन्हा सुरू होतात. गुटका तस्करीची मोठी साखळी असून वरपासून खालपर्यंत लाखो करोडो रुपयांचा व्यवहार या गुटखा तस्करीतून होत असतो. या गुटक्याचा मलिदा सर्वांनाच पोहोच होत असल्याने अनेक वेळा कारवाई दडपल्या जातात मात्र पैसे घेणाऱ्यांना हे लक्षात येत नाही की आज ना उद्या तुमच्या घरातील तरुण सुद्धा या मावा गुटख्याच्या आहारी गेले तर त्यांना सुद्धा कॅन्सर सारख्या घातक रोगांना सामोरे जावे लागणार आहे. याची जाणीव पैसे खाणाऱ्यांनी ठेवायला हवी.

पोलिस व अन्न आणि औषध प्रशासन या गोष्टीकडे
जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचं दुसून येतेय त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यासह नगर शहरा गुटखा मावा बनवण्यासाठी प्रसिद्ध झाले आहे.अनेक शहारात पानटपरीवर नगरचा प्रसिद्ध मावा मिळेल अशा पाट्या पाहायला मिळतात तरूण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन गुन्हेगारी वाढू पाहत आहे.पोलिस आणि अन्न औषध प्रशासनाने कडक कारवाया करत वेळीच अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular