Home राज्य राष्ट्रवादी विध्यर्थी कांग्रेसचा तो आदेश वादग्रस्त होण्याची शक्यता थेट तोडायचा आदेश

राष्ट्रवादी विध्यर्थी कांग्रेसचा तो आदेश वादग्रस्त होण्याची शक्यता थेट तोडायचा आदेश

मुंबई -, दि १५ मे
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास विजय कदम यांच्या सहीने पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षापश्चिम महा.पदाधिकारी, तालुकाध्यक्ष/कॉलेज अध्यक्षाप्रमाग अध्यक्ष,यांच्या नावाने एक पत्रक काढले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याविरोधात यापुढे कोणी खालच्या थराला जाऊन टीका करत असेल तर अशांना शोधा आणि तोडा ही मोहीम हाती घेण्याचा आदेश दिला आहे.

याबाबत आपल्या विभागात तात्काळ बैठक घेऊन सर्व पदाधिकारी यांना सूचना करावी.असे या पत्रकात लिहण्यात आले आहे.

या पत्रातील शोधा आणि तोडा यावर सध्या आता चांगलीच टीका होऊ लागली असून सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे-पाटील हे गृहमंत्रीपदी असूनही कायदा मोडण्याची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केली जात असल्याने यावर चांगलीच टीका होऊ लागली आहे.
पहा पत्रात काय लिहिले आहे जसे आहे तसे

प्रति.
राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष,
शहराध्यक्षापश्चिम महा.पदाधिकारी,
तालुकाध्यक्ष/कॉलेज अध्यक्षाप्रमाग अध्यक्ष,
पश्चिम महाराष्ट्र..
विषय:- आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या बाबतीत,महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी वक्तव्य घडताना दिसत आहे. त्यामुळे ” इथून पुढे शोधा आणि तोडा” ही मोहीम हातात घेण्याबाबत

पश्चिम महाराष्ट्र मधील सर्व जिल्हाध्यक्ष/शहराध्यक्ष/पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी/कॉलेज अध्यक्ष/प्रभाग अध्यक्ष इत्यादी सर्व पदाधिकारी यांना सूचना आहे की, आदरणीय पवार साहेब हा विचार आहे आणि त्याच विचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न समाज कंटाकाकडून होत आहे त्यामुळे हे सुधारण्याइतपत लायकीचे नाहीत, त्यामुळे यांना सरळ करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कडून,जो कुणी “पवार कुटुंबाबाबतीत खालच्या भाषेत वक्तव्य करत असेल तर त्याला शोधायचे आणि तिथेच तोडायचे” ही मोहीम आपणास आज पासून सुरु करायची आहे. तरी सर्व पदाधिकारी यांनी याबाबत आपल्या विभागात तात्काळ बैठक घेऊन सर्व पदाधिकारी
यांना सूचना करावी.
कळावे आपला
सुहास विजय कदम
(राष्ट्रवादी विद्यार्थिय महाराष्ट्र दिपारममा जमा पश्चिम महाराष्ट्राध्या)
. सलगर वस्ती, डोणगांव रोड, सोल्या मारुती मंदीर जवळ, सोलापूर ४१३००१ ० ९९२१३४००५३M suhaskndam505@gmail.com

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version