Home राजकारण आमदारांच्या फुटी नंतर आता शिवसेनेचे नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर या दोन महत्वाच्या मनपात...

आमदारांच्या फुटी नंतर आता शिवसेनेचे नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर या दोन महत्वाच्या मनपात नगरसेवक शिंदे यांच्या पाठीशी

मुंबई – दि.२२ जुन
राज्यात झालेल्या भूकंपानंतर आता या भूकंपाचे धक्के महानगरपालिकेमध्ये ही जाणवू लागले आहेत.मुंबई-ठाणे या महापालिकांमध्ये भूकंप होऊ शकतो अशी माहिती समोर येत असून ठाण्यातील 50 तर मुंबई मधील 20 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे आता शिवसेनेसमोर मोठा पेचप्रसंग उभा राहणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जात असल्याने नगरसेवकांनीही आता एकनाथ शिंदे यांच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. आमदारांना थांबविण्यात शिवसेनेला यश आले नाही तर काही खासदारही तळ्यात मळ्यात असल्याचं समजून येत आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी बंडखोरी केली तर शिवसेनला गळती नाही तर संपूर्ण पक्ष फुटल्याच समोर येत आहे . शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जाईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version