अहमदनगर दि.४ सप्टेंबर
मागील २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या
जाहीरनाम्यात एमआयडीसीतील बंद पडलेले आयटी पार्क नव्याने सुरू केल्याचे व याद्वारे रोजगार निर्मिती केल्याचा दावा करणारे शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे व येत्या २५ सप्टेंबरला याबाबत म्हणजे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी याचिका दाखल केली होती.
निवडणूक प्रचारादरम्यान व्हिडिओद्वारे नोकरी मिळाली असे सांगणाऱ्या तरुण-तरुणींनी देखील फसवणूक केली असल्याची तक्रार भांबरकर यांनी केली आहे. या प्रकरणी भांबरकर यांनी जिल्हा न्यायालयात खासगी दावा दाखल करुन दाद मागितली होती. मात्र, जिल्हा न्यायालयाने निवडणुकीसंदर्भातील याचिका सुनावणीस असमर्थता दर्शवल्याने यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आले असून, त्याची सुनावणी सुरू झाली आहे. याबाबत म्हणणे मांडण्यासाठी आ. जगताप यांना नोटीस बजावली आहे.