Home शहर शहरातील कायदा सुव्यास्थे बाबत आमदार संग्राम जगताप विधानसभेत आक्रमक

शहरातील कायदा सुव्यास्थे बाबत आमदार संग्राम जगताप विधानसभेत आक्रमक

अहमदनगर दि.३,ऑगस्ट

अहमदनगर शहर विधान सभेचे आमदार संग्राम जगताप यांनी आज आज विधानसभेत शहरातील ढासळत असलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. या वेळी विधानसभेत बोलताना आमदार जगताप म्हणाले की नगर शहर संतांची भूमी असून आज दुर्दैवाने गुन्हेगारीकरण वाढताना दिसत आहे. यामागे पोलीस दलाची निष्क्रियता तेवढीच कारणीभूत आहे. काही वर्षांपूर्वी अध्यात्मिक गुरु राजाभाऊ कोठारी महाराज यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. हल्लेखोरांवर पोलीस प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई केली नाही. हेच हल्लेखोर काही दिवसांपूर्वी औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत सामाजिक सलोखा बिघडवताना दिसले. पोलीस प्रशासनाने वेळीच अटकाव केला असता तर ही प्रवृत्ती बळावली नसती. मागील काही दिवसात कापड बाजारात व्यापारी बांधवांवर प्राणघातक हल्ले झाले, शहरात खुनाच्या घटना घडल्या. पोलीस प्रशासन वेळोवेळी खबरदारी घेत असले असते तर ही गुन्हेगारी वाढली नसती. याचबरोबर शहरात गुटका तस्करी, ऑनलाईन गेमिंग, बिंगो जुगार यासारखे अवैध धंधे ही फोफावत आहेत. यासर्व गोष्टींबाबत मी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे मात्र तरीही शहरात कायदा सुव्यस्था
बिघडलेली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी. शासनाने या गोष्टीकडे त्वरित लक्ष देऊन उचित पाऊल उचलावे असे आवाहन सरकार कडे केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version