Home राजकारण ना भाषणबाजी ना जुमलेबाजी…. ढोल ताशांच्या गजरात स्थानिक नागरिकांच्या हस्ते रोड कामाचा...

ना भाषणबाजी ना जुमलेबाजी…. ढोल ताशांच्या गजरात स्थानिक नागरिकांच्या हस्ते रोड कामाचा शुभारंभ आणि लगेच कामाला सुरुवात आमदार संग्राम जगताप यांचा अनोखा फंडा… नगर शहरात सुरू आहे दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून भरघोस विकास कामे…

अहमदनगर दिनांक ९ ऑगस्ट
ना भाषण ना जुमालेबाजी थेट नारळ वाढवून कामाचा शुभारंभ असाच काहीसा फंडा सध्या नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी वापरला आहे. नगर शहर विकासा साठी आमदार संग्राम जगताप यांनी जवळपास दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला असून या निधीतून सध्या युद्ध पातळीवर नगर शहरातील विविध भागात विकास कामे सुरू झाले आहेत. मात्र हे विकास कामे करत असताना ना भाषणबाजी ना स्टंटबाजी थेट नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्याचा सपाटा सध्या आमदार संग्राम जगताप यांनी लावला आहे. ढोल ताशाच्या गजरात स्थानिक नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून आमदार संग्राम जगताप यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजनाचा कामाचा सध्या सपाटा लावला असून माऊली संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि आप्पू हत्ती चौक ते सर्जेपुरा मार्गे कापड बाजार पर्यंतच्या सिमेंट काँक्रेटचा रोडचा शुभारंभ अशाच प्रकारे करण्यात आला आहे.

अहमदनगर शहर आणि सावेडी उपनगर यांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे अप्पू हत्ती चौक ते सर्जेपुरा मार्गे तेली खुंट आणि कापड बाजार हा अत्यंत वर्दळीचा रस्ता होय. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे अस्तित्व संपले होते संपूर्ण रस्ता खड्डेमय झालेला हा रस्ता फक्त नावापुरताच उरलेला होता. महानगरपालिकेने मध्यंतरी खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला मात्र या त्याची कामामुळे हा रस्ता अजूनच खराब झाला होता. नागरिकांचे हाडे खेळखुळे करणारे आणि कंबरडे मोडणारा रस्ता अखेर आता सिमेंट काँक्रेटचा होणार असून आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहर विकासासाठी आणलेल्या दीडशे कोटी रुपयांमधून हा संपूर्ण रोड सिमेंट काँक्रेटचा होणार आहे. त्यामुळे आता नगरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला हा रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे.

अहमदनगर शहरात सध्या शहर विकासाचे काम वेगाने सुरू असून जिल्हाधिकारी कार्यालय ते माऊली संकुल पर्यंतचा रस्त्याचा कामाचा शुभारंभ नुकताच आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला आहे हा संपूर्ण रस्ता आहे सिमेंट काँक्रेटचा होणार असून या कामाचा फक्त शुभारंभ नाही तर या कामाचे कामही सध्या युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी आणलेल्या दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version