अहमदनगर दि.२० जुलै
गुरुवारी सकाळपासून मोबाईल फोनवर इमर्जन्सी अलर्ट मेसेज येण्यास सुरुवात झाली असून भारतीय दूरसंचार विभागाच्या वतीने हे अलर्ट देण्यात येत आहे. मात्र का देण्यात येत आहेत याबाबत अद्यापही माहिती मिळाली नसून अचानकपणे आपल्या मोबाईल फोनच्या स्क्रीनवर अलर्ट मेसेज येतो आणि एक वेगळीच रिंगटोन वाजायला सुरुवात होती “हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणीचा इशारा आहे” असा अशयाचा मेसेज सकाळपासून अनेक लोकांच्या मोबाईलवर इमर्जन्सी अलर्ट चे मेसेज आले असून नेमकं काय करावे हे अनेक मोबाईल धारकांना समजले नाही.
मात्र हा अलर्ट आल्यानंतर त्या ठिकाणी ओके बटन येतं ते ओके बटन दाबल्यानंतर मोबाईल मध्ये सेटिंग मध्ये जाण्यासाठी सांगण्यात येतं मात्र काहीही (allow ) करू नका
मात्र हा मेसेज आल्यानंतर नोटिफिकेशन मध्ये अलावू (allow) करू नका अन्यथा हा मेसेज अनेक वेळा मोबाईल वर येत राहील ओके दाबून मिनी माईज करून मेसेज क्लिअर करून टाकावा. हा मेसेज भारतीय दूरसंचार विभागाकडून येत असल्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये