अहमदनगर दिनांक 28 जुलै
लोकसभेचे खासदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अवैद्य धंधांविरुद्ध सुरू केलेल्या आंदोलनानंतर असे वाटत होते की आता अहमदनगर जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांचे उच्चाटन होईल मात्र अजूनही पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे जोरात सुरू आहेत.खा. निलेश लंके यांनी उपस्थित केलेल्या बींगो, जुगार ,मटका,आणि लॉजचे धंदे अजूनही सुरू आहेत.
बिंगो आणि ऑनलाईन सट्टेबाजेमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत अनेक तरुणांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. तर अनेक कुटुंब यामुळे बरबाद झाले आहेत. खासदार निलेश लंके यांनी जाहीर केलेल्या हप्त्याच्या यादीमध्ये बिंगो आणि ऑनलाईन जुगार सट्टेबाजी याचाही समावेश होता अशा लोकांवर कारवाई होईल असे वाटत असताना मात्र आजही बिंगो, ऑनलाइन सट्टेबाजी सुरूच आहे.
लॉजमुळे शाळा कॉलेजमधील मुलं शिक्षण सोडून लॉजवर जाताना दिसत आहेत अक्षरशः शाळा आणि कॉलेजच्या ड्रेसवर मुलं मुली लॉजवर जाताना चे चित्र अहमदनगर जिल्ह्यात सर्वात दिसून येत आहे.
खासदार निलेश लंके यांनी जाहीर केलेल्या आकड्यानुसार बिंगो, ऑनलाईन सट्टेबाजी, जुगार, मटका यांच्यापासून पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता मिळतो तर लॉज मधूनही मोठ्या प्रमाणात हप्ते वसूल केले जातात असा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला होता. मात्र चार दिवसाच्या उपोषणानंतर आता हे सर्व अवैध धंदे बंद होतील असे वाटत असताना अवैद्य धंद्यावाल्यांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही आजही बिंगो, ऑनलाईन जुगार,सट्टेबाजी सुरूच आहे .