अहमदनगर दिनांक ४ जून
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची निवडणूक १३ मे रोजी पार पडली आणि सर्वांना ओढ लागली होती ती चार जूनची चार जून रोजी मतदार संघाची मतमोजणी असल्याने सकाळपासूनच सर्वांचे लक्ष हे एमआयडीसी मधील मतमोजणी केंद्रामधील आकड्यांकडे लागून होते. सुरुवातीला सात फेऱ्यांपर्यंत महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी नऊ ते दहा हजार मतांपर्यंत मताधिक्य घेतले होते मात्र सातव्या फेरीनंतर महा विकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी जी आघाडी घेतली ती आघाडी शेवटपर्यंत महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना मोडता आली नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून निलेश लंके यांना भरभरून मते पडली. अहमदनगर शहर आणि राहुरी वगळता सर्वच ठिकाणी निलेश लंके यांचा बोलबाला होता. 22व्य फेरीत निलेश लंके यांचे मताधिक्य कमी झाले. मात्र शेवटपर्यंत सुजय विखे पाटील हे पुढे जाऊ शकले नाहीत.पोस्टल मतदानामध्ये सुद्धा निलेश लंके यांनी बाजी मारली आणि अखेर निलेश लंके 28 हजार 929 मतांनी निवडून आले.
मतमोजणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सलिमठ यांनी निलेश लंके यांना विजयी घोषित करत प्रमाणपत्र दिले. त्यानंतर निलेश लंके यांनी छोट्याशा भाषणात सर्व कर्मचाऱ्यांचे पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानत माझ्याकडून काही चुकले असेल तर मी माफी मागतो असे असे सांगून माझी चूक पदरात घ्या असे सांगितले. त्यानंतर बाहेर जाताना जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निलेश लंके यांची भेट झाली त्यावेळी निलेश लंके यांनी दोन्ही हात जोडत सॉरी म्हणून मागील काही काळात काही गोष्टी बोलून गेलो असेल तर सॉरी म्हणून माफी मागितली त्यांचा हा सरळपणा उपस्थितांना चांगलाच भावला आणि याच कारणामुळे निलेश लंके हे या निवडणुकीत किंगमेकर ठरले आहेत.