अहमदनगर दि.७ नोव्हेंबर
अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या आणि सध्या कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्येअसलेल्या भिंगार शहराचा समावेश हा अहमदनगर महापालिकेमध्ये करावा अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती.याबाबत भाजप खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वी भिंगार येथील नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेऊन चर्चा केली होती.दरम्यान आज खा.सुजय विखेंनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करत पुढील तीन महिन्यांत भिंगार शहराचा अहमदनगर महापालिकेत समावेश करावा अशी मागणी केली आहे.
भिंगार कॅन्टोन्मेंट परिसराचा अहमदनगर महापालिकेत समावेश केल्यास तेथील नागरी सुविधा आणखी चांगल्या पद्धतीने दिल्या जाऊ शकतात. सध्या कॅन्टोन्मेंटमध्ये भिंगारचा समावेश असल्याने स्थानिक नागरिकांना नागरी सुविधाबाबत समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं सुजय विखे यांनी संसदेत सांगितलेय.