Home Uncategorized पतंगाच्या मांजानं केला घात .. गळा कापल्याने पोलिसाचं कुटुंब उध्वस्त.....

पतंगाच्या मांजानं केला घात .. गळा कापल्याने पोलिसाचं कुटुंब उध्वस्त.. अर्ध्या तासात जेवायला येतो म्हणून निघालेला तो पोलीस घरी पोहोचलाच नाही.. आता तरी प्रशासन जागे होणार का ? अजूनही कोणाच्या मृत्यूची वाट पाहणार.. नायलॉन मांजा सर्रास विकला जातोय..

मुंबई दि.२७ डिसेंबर

मुंबईत मांजामुळे कामावरून घरी परत जाणाऱ्या एका पोलीसाचा गळा चिरल्याने मृत्यू झाला. ही घटना २४ डिसेंबर रोजी वाकोला पूलाजवळ घडली.कॉन्स्टेबल समीर जाधव असे मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे. जाधव हे वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये राहतात. ते दिंडोशी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत होते. समीर जाधव हे रविवारी दुपारी काम संपवून दुचाकीवरून घरी जात होते. ते वाकोला पूल येथे आले असता अचानक त्यांच्या समोर पतंगाचा मांजा आला. या मांजामुळे त्यांचा गळा चिरला. गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्त येत असल्याचे त्यांनी या मांजातून वाचण्याचा प्रयत्न केला. यात ते खली पडून गंभीर जखमी झाले.

गंभीर जखमी अवस्थेत पडले असलेल्या समीर जाधव यांना पोलिसांनी सायन रुग्णालयात भरती केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी जाधव यांच्या खिशातील ओळखपत्राद्वारे त्यांची ओळख पटवली.

विशेष म्हणजे समीर जाधव यांनी कामावरून निघत असताना आपल्या पत्नीला फोन करून जेवण तयार ठेव असा निरोप दिला होता मला खूप भूक लागली असल्याने अर्धा तासात मी घरी येत आहे त्यामुळे घरी पत्नी वाट पाहत असताना तिला ही धक्कादायक गोष्ट कळल्यानंतर समीर जाधव यांच्या पत्नीच्या पायाखालची वाळू सरकली होती. एका मांजामुळे अख्ख कुटुंब उध्वस्त झाले असून अनेक वेळा बंदी असलेले कामेच आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोमाने करण्यात येत असतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बंदी असलेला नायलॉन मांजा हा सर्रासपणे विक्री केला जातो या मांज्यामुळे आजपर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत तर लाखो पशुपक्षी यामुळे मृत्युमुखी पडले आहेत. मात्र अशी एखादी घटना घडली तरच त्याच्यावर चर्चा होते थोडीफार कारवाई होते आणि पुन्हा एकदा तो बंद केलेला धंदा जोमाने सुरू होती ही महाराष्ट्रातील वस्तूस्थिती आहे. थोड्याच पैशासाठी लाचार होणारे प्रशासकीय अधिकारी यामुळेच हे बंदी असलेले धंदे जोमाने सुरू असतात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version