Home शहर जन्मठेपेची शिक्षा लागलेला आरोपी सचिन कोतकर याची गुंडागिरी थांबता थांबेना… आधी हॉटेल...

जन्मठेपेची शिक्षा लागलेला आरोपी सचिन कोतकर याची गुंडागिरी थांबता थांबेना… आधी हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण आता थेट मागासवर्गीय समाजाच्या विरोधात वादग्रस्त विधान…

अहिल्यानगर दिनांक 19 ऑक्टोबर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मागासवर्गीय जनतेच्या नावाने वादग्रस्त वक्तव्य किल्ल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे सध्या समस्त मागासवर्गीय समाज संतप्त झाला आहे. या ऑडिओ क्लिप मधील आवाज सचिन कोतकर या समता असून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

या ऑडिओ क्लिप मुळे समस्त मागासवर्गीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे सचिन कोतकर व खडक कारवाई करावी सचिन कोतकर याची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची असून सचिन कोतकर हा एका कुणाच्या गुन्ह्यात आरोपी असून सध्या जमिनीवर मुक्त झालेला आहे सचिन कोतकर यांच्यावर कडक कारण कारवाई केली नाही तर सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयावर समस्त आंबेडकरी आणि मातंग समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा आंबेडकरी समाजाचे अशोकराव गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे यांनी दिला आहे.

सचिन कोतकर याच्यावर जुलै महिन्यात एका हॉटेल व्यवस्थापकाला जीवे मारण्याची धमकी देण्याबाबतचा गुन्हा दाखल असून राकेश कुमार सिंह यांनी आपल्याला सचिन कोतकर सह सात जणांनी मारहाण केल्याबाबतची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली होती या तक्रारीवरून सचिन कोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आरोपी सचिन कोतकर यास जानेवारी 2020 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. कालांतराने अहमदनगर येथील व्यवसाय बघण्यासाठी सचिन कोतकर यांची जिल्हा बंदी उठवण्यात आली होती मात्र एवढ्या मोठ्या प्रकरण झाल्यानंतर सचिन कोतकर यांनी नगरमध्ये आल्यानंतर हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण करून आपली गुंडागिरी कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version