Home शहर लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणी जामीनावर असलेल्या सचिन कोतकरवर कारवाई...

लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणी जामीनावर असलेल्या सचिन कोतकरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी मातंग समाजाचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा ….

अहिल्यानगर दिनांक 21 ऑक्टोबर

अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी सचिन कोतकर याने आंबेडकरी समाज आणि मातंग समाजाबद्दल अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याचा आरोप करत सचिन कोतकर याच्यावर त्वरित कारवाई व्हावी या मागणीसाठी आंबेडकर आणि मातंग समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला देखील सहभागी झाल्या होत्या. अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी सचिन कोतकर हे सध्या जामिनावर बाहेर आहेत नियम अटी घालून न्यायालयाने जामीन दिला असताना देखील कोतकर याने दलित समाजाबद्दल अपशब्द वापरल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

सचिन कोतकर याच्यावर खुनाचे गंभीर आरोप असून सध्या न्यायालयाकडून जामीन घेऊन तो मुक्त झाला असला तरी त्याची गुंडागर्दी थांबत नसून आंबेडकरी समाज आणि मातंग समाजविरोधात काढलेल्या अपशब्दा विरोधात त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकरी समाजाचे नेते अशोक गायकवाड यांनी दिला आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version