Homeक्राईमखुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन.. आरोपीच्या वतीने अॅड. महेश तवले, अॅड विक्रम शिंदे,अॅड...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन.. आरोपीच्या वतीने अॅड. महेश तवले, अॅड विक्रम शिंदे,अॅड अक्षय दांगट यांनी पाहिले काम

advertisement

अहमदनगर दि.१७ डिसेंबर

अहमदनगर मध्ये ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या विवेक गायकवाड खून प्रकरणातील संशयित आरोपी अमित विलास निस्ताने याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

विवेक गायकवाड हा मोल मजुरी करून उदरनिर्वाह चालवत होता मर्डर’चा उलगडा करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले होते. पोलिसांनी अमित विलास निस्ताने ज्याला खून प्रकरणानंतर काही तासातच ताब्यात घेतले होते सुरुवातीला निस्ताने यांनी आपण खून केला नसल्याचे सांगत होते मात्र ज्यावेळी निस्ताने आणि विवेक गायकवाड याचा वाद झाला त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित असलेला सोहेल सय्यद हा महत्त्वाचा दुवा ठरला होता.

या गुन्ह्याबाबत हकीगत अशी की 16 ऑगस्ट 2022 रोजी रात्रीच्या सुमारास यामधील मयत व्यक्ती विवेक गायकवाड हा मिस्कीन मळा तारकपूर रोड येथून जात असताना या प्रकरणातील आरोपीअमित विलास निस्ताने याचे आणि विवेक गायकवाड याचे किरकोळ भांडण झाले. या प्रकरणात विवेक गायकवाड याला अमित निस्ताने याने काठीने डोक्यात मारल्यामुळे मुळे विवेक गायकवाड मयत झाला होता.अशी फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात विवेक गायकवाड यांच्या आईने नोंदवली होती. तसेच हा गुन्हा यावेळी घडला त्यावेळी सोहेल सय्यद या इसमाने ही घटना पाहिली असल्याचं सांगितले होते यावरून अमित विलास निस्ताने याच्या विरोधात खून करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अमित विलास निस्ताने हा ऑगस्ट 2022 पासून अहमदनगर जिल्हा कारागृहात बंदिस्त होता याप्रकरणी जामीन मिळवण्यासाठी अॅड. महेश तवले, अॅड विक्रम शिंदे,अॅड अक्षय दांगट यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अहमदनगर जिल्हा न्यायालयात सत्र न्यायाधीश शित्रे यांच्यासमोर अमित निस्ताने यांच्या बाजूने अॅड महेश तवले यांनी युक्तीवाद केला तपास यंत्रणेने गोळा केलेल्या पुराव्यांची साखळी सकृतदर्शनी आरोपीने गुन्हा केल्याचे सिद्ध करत नाही. या प्रकरणात कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही नाही. केवळ न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाच्या आधारे आरोपीला जामीन नाकारणे कायद्याला धरून नसल्याकडे एडवोकेट महेश तवले यांनी लक्ष वेधले अॅड तवले यांना अॅड विक्रम शिंदे आणि अॅड अक्षय दांगट यांनी सहाय्य केलं

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular