अहमदनगर दि.१९ सप्टेंबर
मुंबईत दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांची जोरदार तयारी सुरू असून येणारा काळच ठरवेल की शिवतीर्थावर दसरा मेळावा मिळावा कोणाचा होणार मात्र त्यासाठी आता दोन्ही गटां कडून जोरदार तयारी करण्यात येत असून अहमदनगर शहरात 21 सप्टेंबर रोजी शिंदे गटाच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे. शहरातील नक्षत्र लॉन या ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी खासदार राहुल शेवाळे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई आणि आमदार अनिल बाबर हे उपस्थित राहणार असून अहमदनगर जिल्ह्यातील शिंदे गटाला माणनारे शिवसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे आणि जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी नगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
अहमदनगर शहरातील विद्यमान नगरसेवकांपैकी आठ ते दहा नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असून लवकरच ते शिंदे गटात येतील अशी माहिती शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी दिली आहे अहमदनगर शहरासाठी आणि भिंगार शहरासाठी एकनाथ शिंदे यांनी निधी देणार आहेत त्याबाबतचे प्रस्ताव देण्यात येणार आहे मुळा डॅम येथून येणारे अतिरिक्त पाणी भिंगार शहराला देणे बाबतचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या सर् सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता मात्र तो विषय पत्रिकेवर आला नाही त्यामुळे या प्रश्नावर चर्चा झाली नसली तरी मुळा डॅम मधून येणारे अतिरिक्त पाणी भिंगारला देणार असल्याबाबतचा प्रस्तावही झालेला असल्याची माहिती अनिल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
या पत्रकार परिषदेला शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख सचिन जाधव बाबूशेठ टायरवाले आदी उपस्थित होते