Home शहर मुळा डॅम वरून नगर शहराला येणाऱ्या पाण्यातून भिंगार शहराला पाणीपुरवठा होणार

मुळा डॅम वरून नगर शहराला येणाऱ्या पाण्यातून भिंगार शहराला पाणीपुरवठा होणार

अहमदनगर दिनांक 19 सप्टेंबर
अहमदनगर शहरात अमृत योजने अंतर्गत फेज टू च्या माध्यमातून भविष्यात नागरकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. त्यानंतर मुळा डॅम येथून नगर शहराला येणारे अतिरिक्त पाणी हे भिंगार शहराला देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी दिली आहे.अहमदनगर शहरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी बोलताना भिंगार शहरासाठी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठा निधी येणार असून याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याची सूचना प्रशासनाला दिली असल्याची माहिती अनिल शिंदे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे नगर शहराला अमृत योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या अतिरिक्त पाण्यातून भिंगार शहराला भविष्यात पाणी देण्यात येणार आहे अशी माहिती अनिल शिंदे यांनी दिले आहे.

भिंगार छावणी मंडळ सध्या एमईएस च्या माध्यमातून भिंगार शहराला पाणीपुरवठा करत आहे. मात्र अहमदनगर शहरातून पाणीपुरवठा करण्याची योजना भविष्यात होऊ शकते यासाठी अहमदनगर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव घ्यावा लागेल सध्याची परिस्थिती पाहता अहमदनगर शहराला दिवसाआड पाणी येत आहे. अनेक ठिकाणी पाण्याला गळती लागलेली आहे. तर अनेक बेकायदेशीर नळ जोडण्यामुळे हे पाणी चोरीला जाते अशी तक्रार वारंवार होत असते. मात्र महानगरपालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. त्यामुळे नगरकरांना रोजच्या पाण्याला मुकावे लागले आहे.महिन्यातून एकदा तरी महानगरपालिकेला पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने पाण्याचे वेळापत्रक बिघडत असते.

मात्र पाण्याच्या प्रश्नावर भविष्यात मोठे राजकारण आणि वादंग होऊ शकते हे नक्की कारण केडगाव परिसरातील ड्रीम सिटी या संकुलाला पाणी दिल्यानंतर महानगरपालिकेत नगरसेवकांमध्ये चांगलाच वाद रंगला होता. आता तर संपूर्ण भिंगार शहराला पाणी द्यायचा प्रश्न आल्याने हा वाद चांगलाच पेटू शकतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version