नगर दिनांक २१ फेब्रुवारी
अहिल्यानगर शहरात बनावट आधार कार्ड बनवून देण्याचा फंडा सुरू असून असाच प्रकार मध्यंतरी उघडकीस आला होता. थेट जेलमध्ये भेटण्यासाठी बनावट आधार कार्ड बनवण्याचं उघड आले असून त्याबाबत अजूनही तपास चालू आहे. तर दुसरीकडे बनावट आधार कार्ड बनवून नगर शहरात बांगलादेशी नागरिकांना सहारा देत असल्यचा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
जुन्या महानगरपालिकेत तर जन्म मृत्यू दाखला देण्यासाठी एक ठराविक टोळी सक्रिय असून ही टोळी सायंकाळी सहा ते सात दरम्यान महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन सर्व माहिती जमा करून संबंधित माणसाला फोन करून हजार ते पाचशे रुपयांना दाखले देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जन्म मृत्यू दाखला देण्यासाठी कंत्राटी कामगार ठेवले असल्यामुळे त्यांना दमदाटी करून एक टोळी. जी त्याच परिसरात सेतू कार्यालयात वावरत असते. ती टोळी या ठिकाणी माहिती घेऊन संबंधित लोकांना त्यांच्या दाखल्या विषयी संपर्क करून हजार ते पाचशे रुपये वसुली करून दाखले देत असल्याची माहिती मिळाली आहे.
त्याचबरोबर एक कटिंग दुकानदार जो परप्रांतीय लोकांना आणि बांगलादेशी लोकांना सेतू कार्यालय मार्फत आधार कार्ड बनवून देण्याचे काम करत असून या ठिकाणी बांगलादेशी लोकांचे बनावट आधार कार्ड काढले गेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सेतू कार्यालयाची चौकशी करून कारवाई होणे गरजेचे आहे. मध्यंतरी एका महिलेला सुद्धा या सेतू कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी फोन करून अश्लील भाषा वापरली होती. याबाबत मनसेने आवाज उठवला होता. मात्र बदनामी नको म्हणून त्या महिलेने तक्रार दिली नाही. असेच अनेक प्रकार समोर येत असून ठराविक लोक या सेतू कार्यालयाच्या माध्यमातून बनावट दाखले देत असल्याची माहिती समोर आली आहे.