अहमदनगर दि.७ डिसेंबर
मागील आठवड्यात आमदार निलेश लंके यांनी नगर दक्षिण मधील तीन राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती संदर्भात उपोषण करण्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला होता. याबाबत राष्ट्रीय महामार्गाने रस्ते दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावू आपण उपोषण करू नये अशी लेखी स्वरूपात लंके यांच्याकडे विनंती केली. मात्र अद्यापही रस्त्याचे काम सुरू न झाल्याने अखेर निलेश लंके यांनी अहमदनगर मधील जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले.
अहमदनगर- पाथर्डी-शेवगाव नांदेड निर्मल रस्ता रा.मा.क्र.६१ व अहमदनगर- राहुरी – कोल्हार – शिर्डी- कोपरगाव रस्ता रा.मा. १६० व अहमदनगर मिरजगाव चापडगाव- करमाळा-टेंभुर्णी रस्ता रा.म.मा. ५६१ /अ या रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे मोठ्या प्रमाणवर नागरिक त्रस्त असून रस्त्यातील मोठ मोठ्या खड्यांमुळे अपघात झाले असून, असंख्य प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच अनुषंगाने मागील २ ते ३ वर्षापासून पाठपुरवा करून देखील संबंधित अधिकारी यांच्याकडून योग्य ती कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळे आज पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमदार
निलेश लंके, शेवगावचे युवा नेते. क्षितिज घुले,ऋषिकेश ढाकणे,बाळासाहेब हराळ, वंचित बहुजन आघाडी,आम आदमी पार्टी,पाथर्डी बार असोसिएशनचे हरिहर गर्जे, शेतकरी संघटना,शिवसेना,शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.