Home राजकारण बंड झाले थंड… नगर शहर मतदारसंघात एकास एक लढत होणार… महाविकास आघाडी...

बंड झाले थंड… नगर शहर मतदारसंघात एकास एक लढत होणार… महाविकास आघाडी कडून सर्वच इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज घेतले मागे..

अहील्यानगर दि.4 नोव्हेंबर

नगर शहर विधानसभा मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे, माजी महापौर भगवान फुलसौंदर,नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असून अर्ज माघारी नंतर सर्वजण मिळून महाविकास आघाडीचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया सर्व नेत्यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नगर शहर मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत चांगलीच चर्चा सुरू होती. शेवटच्या क्षणी महाविकास आघाडी कडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्वच नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले होते त्यांनी एकला चलो ची भूमिका घेतली होती. अखेर आज उद्धव ठाकरे, शरद पवार यांची फोनवर चर्चा झाल्यानंतर सर्वांनी महाविकास आघाडीचे काम करण्याचे ठरवले असून सर्व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.
अपक्ष उमेदवार सुवर्णाताई कोतकर यांनीही आपला अर्ज मागे घेतला असून त्यामुळे आता नगर शहर मतदारसंघात दुरंगी लढत होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version