Homeराजकारणनगर शहर विधानसभा मतदारसंघात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून काका शेळके...

नगर शहर विधानसभा मतदारसंघात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून काका शेळके आमदारकी साठी रिंगणात उतरणार .

advertisement

अहमदनगर दिनांक 23 जून

लोकसभा निवडणूक मध्ये नगर शहरातून महायुतीला चांगले मताधिक्य भेटल्यामुळे आता महायुतीतील घटक पक्षातील सर्वच इच्छुक उमेदवार आता कामाला लागले आहेत. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट पक्षाकडून काका शेळके हे नगर शहर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून काका शेळके हे अहमदनगर शहरामध्ये सूर्या फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या नावाच्या संस्थेचे संस्थापक असून या संस्थेमार्फत त्यांनी आतापर्यंत गरजू लोकांना खूप मदत केलेली आहे.तसेच गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक शालेय साहित्य दिलेले आहे. आयपीएस होण्यासाठी गोरगरिबांना पुस्तक दिले आहेत तसेच कोणालाही अपंगत्व आलं तर मोफत साहित्य देण्याचे काम ते आजही करत आहेत.तसेच वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदामुळे त्यांनी जिल्हाभरात हजारो लोकांना निधी उपलब्ध करून गोरगरिबांची मदत केली आहे. अनेक वेळा रक्तदान शिबिर, वृक्षारोपण करून सामाजिक एकतेचा संदेश त्यांनी वेळोवेळी समाजाला दिला असून मदतीला धावणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

नगर मध्ये आता सध्याला चाललेले हे वातावरण बदलायचे असेल तर काका शेळके यांनी सांगितले मला जर शिवसेनेने तिकीट दिले आणि नगरकरांनी निवडून दिले तर मी शंभर टक्के हेच सर्व काही बदलण्याची किमया करू शकतो. शहराचा विकास बेरोजगारी एमआयडीसी चे प्रश्न याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करून प्रशासन दरबारी याचा पाठपुरावा काका शेळके नेहमीच करत असतात त्यामुळे निवडणुकीत जर पक्षाने संधी दिली तर नगर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची किमया आपण करू असं मतही काका शेळके यांनी व्यक्त केले आहे.

महायुतीमध्ये महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष याचाही समावेश असून या पक्षाने जर अहमदनगर ची जागा मागून घेतली तर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार म्हणून आपण उमेदवारी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केल आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारीसाठी दोन दारे खुली ठेवली आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची लवकरच भेट घेऊन ते भूमिका मांडणार आहेत याआधी दोन वेळा झालेल्या भेटीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्यांनीच काका शेळके यांना उमेदवारी करावी अशी गळ घातली होती त्यामुळे काका शेळके यांच्यासमोर सध्या दोन पर्याय असून ते नेमकी काय भूमिका घेतात हे येणारा काळच ठरवेल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular