अहमदनगर दि. ४ ऑक्टोबर
भारतीय जनता पक्षाचे नगर मतदारसंघाचे माजी खासदार स्व.दिलीप गांधी अध्यक्ष असताना नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली होती .त्यावेळी बँकेच्या गोटात खळबळ उडाली होती.
रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी सुभाषचंद्र मिश्रा यांनी प्रशासक म्हणून कारभार हाती घेतला होता तेव्हापासून बँक चांगलीच चर्चेत आली होती. तब्बल १०९ वर्षांपूर्वी (१९१०) स्थापन झालेल्या नगर अर्बन बँकेवर पहिल्यांदाच प्रशासक नियुक्त झाला होता.
बँकेचा ‘एनपीए’ ३३ टक्के असल्याचे बँकेचे म्हणणे होते तर ऑडिटरच्या मते तो ४० टक्के असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे बँकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमला गेला होता.
त्यानंतर निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये पुन्हा ज्या संचालकांवर आरोप करण्यात आले होते तेच संचालक मंडळ बँकेच्या निवडणुकीत बहुमताने निवडून आले होते.
तेव्हापासून बँक कोणत्या ना कोणत्या कारणाने चांगलीच चर्चेत राहत होती बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी यांनी आरबीआय कडे पाठपुरावा करून सभासद आणि ठेवीदारांच्या ठेवी मिळाव्या यासाठी मोठे प्रयत्न केले होते तर बँकेच्या संचालकांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल होऊन त्या गुन्ह्यांची ही चौकशी सुरू होती याच पार्श्वभूमी राहता आरबीआयने मोठा निर्णय घेतला असून बँकेची मान्यता रद्द करण्यात आली असल्याचे पत्र आरबिआय ने नगर अर्बन बँक आणि सहकार खात्याला दिली असल्याची माहिती समोर येत असून ज्यामुळे आता नगर अर्बन बँकेची मान्यता रद्द झाली तर ठेवीदार सभासद आणि कर्मचारी यांच्यासमोर मोठे संकट उभे राहणार आहे 109 वर्षांचा इतिहास असणारी ही बँक अखेर इतिहास जमा तर होणार नाही ना असा प्रश्न आता सामान्य सभासद कर्मचारी आणि ठेवीदार करत आहेत.