अहमदनगर दि २२ फेब्रुवारी
अहमदनगर एका राष्ट्रीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याने एका महिले बरोबर अरेरावी केल्याचा प्रकार घडला असून हे प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले होते मात्र पोलीस स्टेशनच्या दारातूनच काही जणांनी मध्यस्थी केल्याने या प्रकरणावर सध्या तरी पडदा पडला आहे. मात्र कर्तव्यदक्ष असलेली ती महिला मात्र गुन्हा दाखल करण्याच्या मानसिकतेत असल्याची चर्चा आहे.
काही मध्यस्थीमुळे गुन्हा दाखल झाला नसला तरी कदाचित काही दिवसानंतर गुन्हा दाखल होऊ शकते.
एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस राज्यात कायदा सुव्यवस्था बाबतीत वारंवार चांगली आहे असे सांगत असताना एका राष्ट्रीय पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने महिला पोलिसाशी अरेरावी करून तिचा व्हिडिओ काढल्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
एकीकडे भाजपचे आमदार आमचा बाप सागर बंगल्यावर असल्याचं सांगत असतानाच महिले बरोबर अरेरावी करून राजकीय लोक कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवत असल्याचं सिद्ध करत आहेत.
एक महिला आपले कर्तव्य करून दुचाकीवरून घरी जात असताना मागून आलेल्या त्या पदाधिकाऱ्याने स्वतः च्या मोबाईल वरून त्या महिलेचे शूटिंग केले ही बाब त्या महिलेच्या लक्षात येताच तिने गाडी थांबवून याबाबत विचारणा केली मात्र पदाधिकारी आणि त्या महिलेची चांगलीच खडाजंगी झाली त्या पदाधिकाऱ्याने अरेरावी करत माजी मर्जी मी काहीही करेल असे म्हणत काही कमेंट्सही केले आणि सत्तेच्या गुरमीत असलेल्या त्या पदाधिकाऱ्याने त्या महिलेला दम देऊन तुला दाखवतो असे म्हणून निघून गेला अशी चर्चा आहे.
एकीकडे महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस ठाण्यात गोळीबार तसेच अनेक कायदा सुव्यवस्था बिघडणारे उद्योग सर्वत्र चालू असून तरीही सरकार कायदा सुव्यवस्था अबाधित असल्याचे सांगत आहे.मात्र गृहमंत्र्यांना आता महिला सुरक्षा साठी कठोर पावले उचलावी लागतील राजकीय पदाधिकाऱ्याकडून एका महिलेला अशी वागणूक मिळत असेल तर यावरून दुर्दैव काय असेच म्हणावे लागेल कुंपणच जर शेती खात असेल तर तक्रार कोणाकडे करायची असाही प्रश्न उपस्थित राहतोय.