Home Uncategorized खा,. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना कोर्टाचा दिलासा अटी शर्ती...

खा,. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना कोर्टाचा दिलासा अटी शर्ती वर जमीन मंजूर

मुंबई दि.४ मे
तुरुंगात असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या जामिनावरील निर्णय आला असून गेल्या १४ दिवसा पासून दोघे जेल मध्ये होते नवनीत आणि रवि राणा यांना काही अटी शर्तींवर जामीन मंजूर झाला आहे मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांना 23 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यांच्या या घोषणेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी दोघांविरुद्ध देशद्रोह आणि “वेगवेगळ्या गटांमध्ये द्वेष पसरवण्याच्या” आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version