अहमदनगर दि.१४ जानेवारी
संक्रांतीच्या आदल्या दिवशी भिंगार कॅम्प पोलिसांनी सारसनगर भागातील गाडळकर मळा येथे एका दुकानावर छापा टाकून सुमारे 30 हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे याप्रकरणी पांडुरंग गाडळकर यांच्या विरोधात भिंगार काम पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम 188.336 सह पर्यावरण संरक्षण अधि. 1986 चे कलम 5.15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो स इ बेडकोळी,स फौ कैलास सोनार,पो ना राहुल द्वारके,पो कॉ अमोल आव्हाड,पोकॉ अरुण मोरे यांनी ही कामगिरी केली आहे