Home शहर *🪁नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या ओंकार सुरेश कांबळे वर तोफखाना पोलिसांची कारवाई.. तीस...

*🪁नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या ओंकार सुरेश कांबळे वर तोफखाना पोलिसांची कारवाई.. तीस हजार रुपयांचा नायलॉन मांजा पकडला

अहिल्यानगर दिनांक १३ जानेवारी
पोलीस प्रशासनाने महसूल प्रशासनाने आणि महानगरपालिका प्रशासनाने अनेक वेळा आव्हान करूनही अजूनही काही मांजा विक्रेते नायलॉन मांजा विक्री करताना आढळून येत असून नगर शहरातील तोफखाना भागात असलेल्या ओंकार सुरेश कांबळे याच्यावर तोफखाना पोलिसांनी कारवाई करत त्याच्या कब्जातून जवळपास 30000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.

नगर शहरातील नवरंग व्यायाम शाळेजवळ कांबळे नामक एक युवक नायलॉन मांजा विक्री करत आहे. अशी माहिती तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन खात्री करण्याची सूचना केली होती त्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनचेसपोनि श्री
उज्वलसिंग राजपुत, पोउपनिरी श्री सचिन रणशेवरे, पोउपनिरी श्री शैलेश पाटील, पोहेकॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट,, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, योगेश चव्हाण, गणेश धोत्रे, सुधीर खाडे, सुरज वाबळे, पो.ना वसीम पठाण, पो.कॉ. सुमीत गवळी, शिरीष तरटे, सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतीष भवर, पोकॉ संदिप गि-हे, यांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता ओंकार सुरेश कांबळे हा नायलॉन मांजा विक्री करताना मिळुन आला त्याच्याकडे ३०,०००/- रुपये किंमतीचे ६० नग नायलॉन मांजा MONO KTC
FIGHTER नाव लिहलेले चकऱ्या मिळुन आल्याने त्यास मुददेमालासह ताब्यात घेवुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचे वरती भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२५ वगैरे प्रमाणे पोकों / म्हस्के यांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोहेकॉ गर्जे हे करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version