मुंबई दि.१५ फेब्रुवारी
अजित पवार केवळ सरकारमधून, पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला होता. शरद पवारांचा गट आणि अजित पवारांचा गट अशी फूट पडली होती .
शिवसेनेप्रमाणेच ही लढाई निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्षांपर्यंत जाऊन पोहोचली. आता या निर्णयापाठोपाठ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीचा निकालही आज समोर आला असून विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सुरुवातीला निकाल वाचन करताना सांगितले की निकाल देताना संख्याबळ लक्षात घेणार पक्ष कोणाचा या बाबत निर्णय झाल्यानंतर आमदार अपत्रेवर निकाल देणार असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच जाहीर केले. या निकाल वाचनाच्या वेळी शरद पवार गटाचा एकही आमदार उपस्थित नव्हता.
निकाल देताना नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्ट तसेच विविध पाच निकालांचे वाचन केले पक्षाबाबत निर्णयासाठी नेतृत्वाचा आधार नाही पक्ष कोणाचा आहे ठरताना पक्षाचा घटनेचाही विचार नाही अजित पवार गट मूळ राष्ट्रवादी पक्ष विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर अजित पवार हेच पक्षाचे नेते असल्याचं समोर येते विधिमंडळाचा बहुमताचा आकडा अजित दादांकडे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांची असल्याचा निकाल त्यांनी शेवटी दिला. अजित पवार गटाचा एकही आमदार अपात्र नाही.
पक्षात पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गटांकडून विरोधी गटांतील आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं अर्ज सादर करण्यात आले होते. या प्रकरणी सुनावणीला विलंब होत असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 31 जानेवारीपर्यंत स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक तयार करून ही सुनावणी घेण्यात आली. यामध्ये दोन्ही गटांचं म्हणणं विधानसभा अध्यक्षांनी ऐकून घेतलं. दोन्ही गटांच्या आमदारांची उलटतपासणी झाली. साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या.