Home राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ अ‍ॅट्रोसिटीचा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, वाशिम कोर्टाचा आदेश

वाशिम दि.१५ नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेलमध्ये असताना त्यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक बातमी समोर आलीय. नवाब मलिक यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, असा आदेश वाशिम कोर्टाने पोलिसांना दिला आहे. एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेप्रकरणी कोर्टाने पोलिसांना नवाब मलिकांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलाय.

नवाब मलिकांकडून समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक वेगवेगळे दावे करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक दावे केले होते. त्यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जुने फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. त्यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता.

समीर वानखेडेंनी या प्रकरणी वाशिम सत्र न्यायलयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी नवाब मलिकांविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version