अहिल्यानगर दिनांक ९ डिसेंबर
कोपरगाव, मनमाड, संगमनेर, शिर्डी या ठिकाणी जाणाऱ्या चार चाकी जड वाहतूक म्हणजे ट्रक चालकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी वेळेत घाट बायपास चौकात शहर वाहतूक पोलिसांचा एक चेक नाका पॉइंट लावण्यात आला आहे. मात्र या चेक नाका पॉइंट नसून पैसे वसुलीचा नका झाला आहे.या नाक्यावर रात्री मोठा खेळ चालत असून काही खाजगी इसम पोलिसांच्या समोरच ट्रक चालकांकडून 300 ते 700 रुपये टोल वसुली करत आहेत.जर गाडी राहुरी मार्गे सोडायचे असल्यास ट्रक चालकांकडून पैसे घेतले जातात जो ट्रक चालक पैसे देत नाही त्याला छत्रपती संभाजी नगर महामार्ग मार्गे सोडले जाते आणि जे ट्रक चालक पैसे देतात त्यांना राहुरी मार्गे सोडले जाते. हा खेळ रात्री दहा पासून तो पहाटेपर्यंत सुरू असतो. शेकडो ट्रक रात्रभर या मार्गावरून मार्गस्थ होत असतात जे ट्रक चालक पैसे देत नाही त्यांना वेळप्रसंगी या ट्रक चालकांना मारहाण केली जाते.
या ठिकाणी शहर वाहतूक पोलीस कार्यरत असतात मात्र हे पोलीस बघ्याची भूमिका घेऊन रोडवर उभे असतात आणि खाजगी इसम त्यांच्या समोर पैसे वसूल करतात.आणि पोलिस पैसे वसुलीवर लक्ष ठेवून असतात. पोलिसांना एका रात्री या ठिकाणी ड्युटी लावण्यासाठी तीस हजार रुपये वरिष्ठांना द्यावे लागतील अशी कबुलीही काही कर्मचाऱ्यांनी दिली आहे. हे सर्व पैसे राठोड नामक व्यक्तीकडे पोहोच झाल्यानंतर ती रक्कम वरिष्ठांपर्यंत पोहोचते जर राठोड ला पैसे दिले नाही तर त्या कर्मचाऱ्याच्या जागी त्या पॉइंटवर दुसऱ्या दिवशी वेगळ्याच पोलिसाची ड्युटी लागते. त्यामुळे रात्री जमा केलेले पैसे राठोड कडे सकाळी जमा करावे लागतात.
आणि विशेष म्हणजे शहर वाहतूक शाखेच्या मदतीला या ठिकाणी महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित असतात हे ही एक मोठे आश्चर्य म्हणावे लागेल.
त्यामुळे आता शहर वाहतूक शाखेने राठोड या खाजगी इसमास कायमस्वरूपी नोकरीवर ठेवून घेणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे महाराष्ट्र शासनाला मोठा महसूल जमा होऊ शकतो त्यामुळे खाजगी इसम असलेल्या राठोडला शहर वाहतूक शाखेने कायमस्वरूपी आपल्या शाखेत भरती करून घेणे गरजेचे आहे अशा लोकांची गरज शहर वाहतूक शाखेला आहे .
शहर वाहतूक शाखेचे पोलीस विळद बायपास चौकात मुद्दामहून अनेक ट्रक एकाच वेळी बराच वेळ थांबून ठेवतात त्यामुळे कंटाळून ट्रक चालक पैसे देऊन मार्गस्थ होतात. हा रात्रीस खेळ रोज चालू असून लाखोंची कमाई वरिष्ठांना देण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी जीवार उदार होऊन ट्रक चालकांना मारहाण करून हे पैसे वसुली करतानाचे चित्र रोज पाहायला मिळते.
